उस्मानाबाद : जिल्ह्यातील वाशी शहरालगत शेतात काम करीत असणाऱ्या शेतकऱ्यासमोर अवकाशातून अचानक अडीच किलोचा दगड पडला. मग काय अचानक घडलेल्या प्रकारामुळे थोड्या वेळासाठी का होईना शेतकऱ्याची भंबेरी उडाली होती. नेमका काय प्रकार घडला हे शेतकऱ्याच्याही लक्षात आले नाही. थोड्या वेळाने स्व:ताला सावरत शेतकऱ्याने झालेला प्रकार नागरिकांना सांगितला आणि हा लाल रंगाचा अडीच किलोचा दगड आता तपातणीसाठी थेट उस्मानाबाद येथे नेण्यात आला आहे.
त्याचे झाले असे वाशी येथील प्रभु माळी हे शहरालगत असलेल्या शेतामध्ये दररोजच्या प्रमाणे काम करीत होते. शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड केली असून शुक्रवारी सकाळी ते भाजीपाला तोडण्यासाठीच शेतात गेले होते. दरम्यान, काम करीत असताना अचानक त्यांच्या समोर लाल रंगाचा साधारण:ता अडीच किलोचा दगड अवकाशातून पडला.
या अनोख्या प्रकाराची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. हा नेमका काय प्रकार आहे. याची शहनिशा करण्यासाठी नागरिकांनी आणि प्रभु माळी यांनी हा दगड तहसीलदार नरसिंह जाधव यांच्याकडे दिला आहे. यावेळी एक विशिष्ट आवाज करीत हा दगड जमिनीवर पडल्याचे माळी यांनी तहसीलदार यांना सांगितले.
एवढ्यावरच हे प्रकरण मिटले नाही तर पडलेल्या दगडाचा आणि तेथील जागेचा पंचनामा करणयात आला आहे. शिवाय या प्रकाराची माहिती तहसीलदार यांनी उस्मानाबाद येथील भुवैज्ञानिक कार्यालयास दिलेली आहे. आता परीक्षणानंतरचे दगडाचे गुपीत काय हे समोर येणार आहे.
आकाशगंगतील उल्कापातानंतर ग्रहाचे तुकडे त्यांच्या कक्षेतून ते पृथ्वीच्या कक्षेत येतात. या दरम्यान ते जळालेल्या अवस्थेत असतात. तर काहींची राखही होते. त्यातलाच हा प्रकार असल्याची शंका वर्तवली जात आहे. पण याबद्दल अधिकृत दुजोरा कोणीही दिलेला नाही. उस्मानाबाद येथे पाठविण्यात आलेला दगड हा नागपूरला पाठविण्यात आला आहे. नागपूर परिसरात अशा घटना समोर आलेल्या आहेत. याचे परीक्षण केल्यानंतरच हा काय प्रकार होतो हे स्पष्ट होईल.
शुक्रवारी दगडाचा आणि त्या जागेचा पंचनामा केल्यानंतर शनिवारी उस्माबाद येथील भुवैज्ञनिक कार्यालयातील अधिकारी माळी यांच्या शेतावर आलेले होते. यावेळी त्यांनी जागेची पाहणी केली. शेतकरी प्रभु माळी यांच्याशी विचारणाही केली. शिवाय नागरिकांनी घाबरुण जाण्याचे काही कारण नसून अहवाल येताच दगडाविषयी अधिकृत सांगता येणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, लाल दगडाची वाशी शहरात गेल्या दोन दिवसापासून चर्चा रंगत आहे. (The stone fell in front of the farmer from the sky, the exact reason why the search is on)
VIDEO : रावसाहेब दानवेंनी भरसभेत स्वत:चा फाटलेला शर्ट दाखवला
शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय
पालिका अधिकाऱ्यांना खड्डे भोवले; ठाणे महापालिकेचे चार अभियंते निलंबित