निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात

नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात झाली. ऐन काढणी सुरु असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण अवकाळीने कृपादृष्टी दाखवली अन् रब्बीतील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. अवकाळीचे संकट टळले तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे.

निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात
रब्बी हंगामातील गव्हाची आवक सुरु झाली आहे पण बाजारपेठेतील दर घसरले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 2:03 PM

औरंगाबाद : नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात झाली. ऐन काढणी सुरु असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण (Unseasonal Rain) अवकाळीने कृपादृष्टी दाखवली अन् रब्बीतील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. अवकाळीचे संकट टळले तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. कारण काढणीपर्यंत (Wheat Rate) गव्हाला उच्चांकी दर होता मात्र, रब्बी हंगामातील गहू बाजारात दाखल होताच 3 हजार रुपये क्विंटलवर गेलेला गहू थेट 2 हजार 300 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर याप्रमाणेच गव्हाचीही साठवणूक की विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

कशामुळे झाली दरात घट?

मध्यंतरी रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत झाला होता. गव्हाच्या मागणीत वाढ झाल्याने दर 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. त्यामुळे यंदा वाढीव उत्पादनाबरोबरच वाढीव दरही मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मार्चच्या सुरवातीला गव्हाचे दर वाढलेले होते. पण आता चित्र बदलले आहे. बाजारपेठांमध्ये गव्हाला 1 हजार 900 ते 2 हजार 300 पर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे गव्हाबाबत काय निर्णय घ्यावा या विवंचनेत शेतकरी आहेत.

रब्बी हंगामातील आवक सुरु पुढे काय?

सध्या रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. पण दरात सातत्याने घसरण होत असल्याने नेमकी साठवणूक की विक्री याबाबत शेतकरी चिंतेत आहे. पण अशाचप्रकारे आवक वाढत राहिली तर मात्र दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ गहूच नाही तर सध्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याबाबतही अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात येताच अशी परस्थिती निर्माण होत आहे.

अवकाळीचे संकट टळले, दराच्या कचाट्यात शेतीपिके

रब्बी हंगामातील काढणी सुरु असतानाच मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अवकाळीने अवकृपा दाखवली नाही त्यामुळे नुकसान टळले होते. पण बाजारपेठेतील दरात चढउतार असल्याने शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे. रशिया-युक्रेन युध्दाचा परिणा गव्हाच्या दरावर असला तरी इतर पिकांचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे सुगी होऊनही शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार की नाही हा प्रश्न कायम आहे.

संबंधित बातम्या :

Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही

Chickpea Crop : शेतकऱ्यांनो हमीभावाचाच घ्या आधार अन्यथा होईल नुकसान, ऊन-पावसाच्या खेळात घटले उत्पादन

पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.