Rabi season : ज्वारीचं उत्पन्न वाढणार, प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय, चांगलं उत्पन्न निघणार असल्यामुळे शेतकरीवर्ग आनंदीत
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर गावाच्या शिवारात विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटने शेतात आग लागल्याने नऊ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे.
नांदेड : रब्बी हंगामातील (Rabi season) उन्हाळी ज्वारी कापणीला (Sorghum harvest) आता सुरुवात झाली आहे. यंदा थंडीच्या लाटेमुळे ज्वारीचे पीक पंधरा दिवस आधीच काढणीला आले आहे. त्यातच पोषक हवामानामुळे ज्वारीच्या उत्पादनात काहीशी वाढ देखील झाल्याचे दिसून येतं आहे. त्यामुळे बळीराजा (Farmer happy) आनंदित झालाय आहे. उन्हाळी टाळकी ज्वारीला बाजारात प्रति क्विंटल पाच हजारांचा भाव सध्या मिळतोय, त्यातून चांगलं उत्पन्न होताना दिसतंय.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा येथील सचिन पाकधने यांनी रब्बीत ज्वारीचं पीक घेतले पीक चांगले बहरले असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे नेस्तनाबूत झाले आहे. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. दरम्यान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश संबंधित विभागाला देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी मंगळसा येथील शेतकरी सचिन पाकधणे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नऊ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर गावाच्या शिवारात विद्युत रोहित्राच्या शॉर्टसर्किटने शेतात आग लागल्याने नऊ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत दोन शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. नादुरुस्त असलेल्या रोहित्रामुळे आग विझवण्यासाठी पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही, महावितरणच्या चुकीमुळे शेतकरी देशोधडीला लागले असून याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.