चोरट्यांनी हेही सोडलं नाही, रात्रीतून 20 टन टरबुज लंपास, 75 दिवसांची शेतकऱ्याची मेहनत मातीमोल
नैसर्गिक संकटाशी दोन हात करीत शेतकरी या प्रतिकूल परस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये पूर्णत: यश मिळत नसले तरी उत्पादनाचा मेळ घालण्याचा सर्वकश प्रयत्न केला जात आहे. अशा नैसर्गिक संकटाचा सामना गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. मात्र, 75 दिवस अथक परिश्रम, योग्य नियोजन करुन आता कलिंगडातून लाखोंचे उत्पन्न पदरी पडणार असे असताना एका रात्रीतून 3 एकरातील तब्बल 20 टन टरबुजाची चक्क चोरी झाली आहे.
इंदापूर : नैसर्गिक संकटाशी दोन हात करीत (Farmer) शेतकरी या प्रतिकूल परस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये पूर्णत: यश मिळत नसले तरी उत्पादनाचा मेळ घालण्याचा सर्वकश प्रयत्न केला जात आहे. अशा नैसर्गिक संकटाचा सामना गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. मात्र, 75 दिवस अथक परिश्रम, योग्य नियोजन करुन आता लाखोंचे (Watermelon ) टरबुज उत्पन्न पदरी पडणार असे असताना एका रात्रीतून 3 एकरातील तब्बल 20 टन टरबुजाची चक्क चोरी झाली आहे. त्यामुळे केवळ (Nature) निसर्गाच्या लहरीपणामुळेच नाही तर चोरट्यांच्या या अजब प्रकारामुळेही शेतकऱ्यांचे हे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावातील शेतकरी पंकज शिंदे व स्वप्नील शिंदे यांच्या शेतामध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे लाखोंचे नुकासान झाले आहे. त्यामुळे ही कसली दुश्मनी हाच सवाल कायम आहे.
वेगळा प्रयोग अन् अथक परिश्रम
पारंपारिक पिकांमधून अधिकचे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शिंदे बंधुंनी 4 एकरामध्ये किलंगडाचा प्रयोग केला होता. अथक परिश्रम करुन त्यांनी याची जोपासणा केली होती. शिवाय मालही चांगला असताना या 3 एकरामध्ये 40 टन माल मिळेल असा अंदाज होता. त्यामुळे 4 लाखाचे उत्पन्न होईल असा अंदाज होता. मात्र, एका रात्रीतून त्यांची 3 महिन्यांची मेहनत तर वाया गेली आहे पण लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. या 3 एकरातील फडापैकी दीड एकरातील कलिंगडाची चोरी झाली आहे. आता शेतीमाल चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे.
गुन्हा दाखल तपास सुरु
शेतकरी पंकज शिंदे हे नेहमीप्रमाणे शेतामध्ये आले असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दीड एकरातील क्षेत्रावर कलिंगडच नव्हते. त्यांनी हा प्रकार बंधु स्वप्नील यांना सांगून इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तब्बल 4 लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आता गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. मात्र, शेतीमालाच्या चोरी बाबत गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याची नामुष्की शिंदे बंधुवर ओढावली आहे. त्यामुळे आता नेमका चोरी झालेल्या कलिंगडाचा शोध लागतो का हेच पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
महारेशीम अभियानाचा उद्देश साध्य, आता उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा ?
Beed : आस्मानीनंतर आता सुलतानी संकट, पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय अन् पिकांचे नुकसान