या जिल्ह्यातील केळीला आखाती देशांमध्ये मोठी मागणी, दरात अजून वाढ होण्याची शक्यता
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात जाणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. केळीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबार : शहादा तालुक्यातील (Shahada) ब्राह्मणपुरी परिसरात (Brahmanpuri Area) निर्यातक्षम केळीचे उत्पन्न घेतले जात आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील केळीला भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील मोठ्या प्रमाणात मागणी असून, जिल्ह्यातील केळी आता आखाती देशांकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. आगामी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची मागणी वाढली असून निर्यात होणाऱ्या केळीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. विशिष्ट पद्धतीने पॅकिंग करून कंटेनरमध्ये पॅक होऊन केळी आखाती देशांकडे निघाली आहे. येणाऱ्या काही दिवसात असलेला रमजान आणि इतर सन उत्सवामुळे केळीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून जवळपास ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात जाणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. केळीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे मिरची व्यापारीचे देखील मोठे नुकसान झालं आहे. जिल्ह्यात एका आठवड्यांत तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्या नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची सुकवण्यासाठी पथार्यांवर पाथरण्यात आली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मिरचीचे देखील मोठे नुकसान झालं आहे. मात्र शासनाकडून शेतकरी ना मदत देण्यासाठी अनेक घोषणा केल्या जात आहे, परंतु व्यापारींना कुठलीही शासनाकडून मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापार देखील अडचणीत सापडत आहे. त्यासाठी शासनाने शेतकरी सोबतच व्यापाऱ्यांना देखील मदतीच्या हातभार लावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे सतत येणाऱ्या अवकाळे पावसामुळे मिरची व्यापारी दरवर्षी नुकसान होत चालला आहे त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक विचार करावा आणि मदत देण्यासाठी काहीतरी तरतूद करावी एवढी मागणी व्यापारी ने केली आहे.
अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके मातीमोल
जिल्ह्यात सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून, यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली होती त्यापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहूची पेरणी झाली होती. तर त्या खालोखाल हरभरा, रब्बी ज्वारी आणि मका या पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात पहिल्यांदा सात मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला होता, तर आता १३ तारखेपासून सतत तीन दिवस जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संपामुळे पंचनाम्यानवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.