Nagpur: शासकीय केंद्रावरही नाही तुरीला दराची हमी, शेतकऱ्यांचा कल खुल्या बाजारपेठेकडेच

1 जानेवारीपासून राज्यात 186 हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय तूरीला 6 हजार 300 असा दरही नाफेडच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील चित्र हे वेगळेच असल्याचे नागपूर येथील केंद्रावर समोर आहे.

Nagpur: शासकीय केंद्रावरही नाही तुरीला दराची हमी, शेतकऱ्यांचा कल खुल्या बाजारपेठेकडेच
नागपूर येथील हमीभाव केंद्रावर तुरीची झालेली आवक
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:15 AM

नागपूर : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची सध्या बाजारपेठेमध्ये आवक वाढत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली असली तरी योग्य दरातून भरपाई व्हावी या उद्देशाने (Guarantee Centre) हमीभाव केंद्र उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार 1 जानेवारीपासून राज्यात 186 हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय (Toor Crop) तूरीला 6 हजार 300 असा दरही नाफेडच्यावतीने देण्यात आला आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील चित्र हे वेगळेच असल्याचे (Nagpur) नागपूर येथील केंद्रावर समोर आहे. तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिकच असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा माल हा 5 हजार 100 ते 5 हजार 500 या दरम्यान खरेदी केला जात आहे. त्यामुळे ही केंद्र उभारुनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सरकारनेच योग्य ते धोरण ठरवून तुरीची खरेदी करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. शासनाने यंत्रणा उभारली असतानाही शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच विक्री केली तर परवडत आहे. त्यामुळे सरसकट तुरीची खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

नेमकी तूर खरेदीला अडचण काय?

नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर ठरवून दिलेल्या निकषानुसारच माल खरेदी केला जात आहे. यंदा अनियमित पावसामुळे ऐन काढणीच्या प्रसंगी तूर पीक पाण्यात होते. शिवाय काढणीनंतरही ऊन न मिळाल्याने आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. जर शेतीमालामध्ये 10 टक्के पेक्षा अधिक आर्द्रतेचे प्रमाण असले तर त्याची खरेदी ही ठरवून दिलेल्या दरात केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीला आता 5 हजार 100 ते 5 हजार 500 याप्रमाणे दर मिळत आहे. दुसरीकडे खुल्या बाजारात अधिकचा दर असल्याने ही खरेदी केंद्र उभारुन तरी काय उपयोग असा सूर शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

काय आहे खरेदी केंद्रावरील स्थिती?

नाफेडच्यादतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्र सध्या सुरु झाली आहेत. मात्र, तुरीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण असल्याने त्याची वर्गवारी केली जात आहे. त्यामुळे ठरवून दिलेला दर एकाही शेतकऱ्याला मिळालेला नाही. सर्वकाही कमी दराने द्यावे लागत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या तुरीला 5 हजार 500 रुपयांपर्यंतचाच दर मिळत आहे. 6 हजार 300 रुपये दर हा नावालाच असून एकाही शेतकऱ्यास याप्रमाणे दर मिळत नाही हे वास्तव नागपूर येथील खरेदी केंद्रावर समोर आले आहे.

मग हमीभावाचा निर्णय कशाला?

तुर खरेदी केंद्राचा उद्देश सध्यातरी साध्य होताना दिसत नाही. कारण हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडेच तुरीची अधिकची विक्री होत आहे. कारण खरेदी केंद्रावर तुर विकायची असेल तर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागते. याकरिता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता, शिवाय शेतीमाल तपासूनच खरेदी आणि एवढे होऊनही पैसे हे 15 दिवसांनतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. हे सर्व करुनही ठरवून दिलेल्या दरात खरेदी होत नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :

टरबूज-खरबूजची लागवड करताना ‘अशी’ करा वाणांची निवड, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Agricultural Department : … म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?

आग लागून 32 एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.