Beed : राज्यात धो-धो बरसला पाऊस, बीडचे चित्र मात्र वेगळेच, पिके बहरली पण पाणीसाठ्याचे चित्र काय ?
बीड जिल्ह्यामध्ये एकूण 144 लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील पाणीताळीत फरक राहिलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच समप्रमाणात पाऊस झाला असे नाही तर अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र, रिमझिम असेच स्वरुप राहिलेले आहे. त्यामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळालेला आहे.
बीड : (Monsoon Rain) राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी सर्वत्रच अलबेल असे चित्र नाही. त्यामुळे मान्सूनने आपला लहरीपणा दाखवला असून त्याचा परिणाम बीड जिल्ह्यावर पाहवयास मिळत आहे. जिल्ह्यात देखील सर्वत्र पावसाचे प्रमाण एक राहिलेले नाही. (Less rain) कुठे मुसळधार तर कुठे भिज पाऊस झालेला आहे. त्यामुळे कहीं खुशी..कहीं गम अशीच स्थिती आहे. तर प्रकल्पामध्ये अद्यापही (Water Stock) पाणीसाठा वाढलेला नाही. अत्यल्प स्वरुपात झालेल्या पावसाचा फायदा केवळ खरीप हंगामातील पिकांना झालेला आहे. तर दुसरीकडे परळी आंबाजोगाई तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या दोन तालुक्यातील 6 प्रकल्प हे तुडूंब भरले आहेत तर उर्वरित 139 प्रकल्पांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
75 प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखालीच
बीड जिल्ह्यामध्ये एकूण 144 लहान-मोठे प्रकल्प आहेत. मात्र, प्रत्येक प्रकल्पातील पाणीताळीत फरक राहिलेला आहे. जिल्ह्यात सर्वत्रच समप्रमाणात पाऊस झाला असे नाही तर अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यांवर वरुणराजाची कृपादृष्टी राहिली आहे तर उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र, रिमझिम असेच स्वरुप राहिलेले आहे. त्यामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात लहान आणि मोठे असे 144 प्रकल्प असून त्यातील 75 प्रकल्प आजही जोत्याखाली आहेत. पावसाने अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील सहा प्रकल्प 100% क्षमतेने भरले आहे.
बिंदुसरा धरणात 37 टक्के पाणीसाठा
बीड शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय या धरणातील पाणीपातळी खालावली तर माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. गतवर्षी तुडूंब भरुन वाहणाऱ्या बिंदूसरा धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नसून भविष्यात अपेक्षित पाऊस झाला तरच पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. अन्यथा नागरिकांना पुन्हा एकदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
पिकांना मात्र पोषक वातावरण
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातल्याने सर्वाधिक नुकसान हे खरीप हंगामातील पिकांचे झाले आहे. तर दुसरीकडे पिकांना अपेक्षित असाच पाऊस बीड जिल्ह्यामध्ये बरसलेला आहे. त्यामुळे नुकसान तर नाही पण पिके बहरत असून वाढही चांगली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अधिकचे पैसे खर्च करुन सध्या पीक फवारणीची कामे सुरु आहेत.