Kharif Season : अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबतही शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला..!

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारही अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला निसर्गाची साथ मिळाली तर शेती तोट्यात नाही उलट शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अशीच शेती आहे. गतवर्षी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा आता पाऊसकाळ चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल.

Kharif Season : अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबतही शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला..!
उपमुख्यमंत्री अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 2:52 PM

पुणे : खरीप हंगामात (Chemical Fertilizer) रासायनिक खतांचा पुरवठा आणि कीटकनाशक व तणनाशकांच्या दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात एक ना अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्यामुळे उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच अधिकचा खर्च असे चित्र निर्माण होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Kharif Season) खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण करुन तुम्ही कामाला लागा शेतकऱ्यांना कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही ही राज्य सरकारची जाबाबदारी असल्याचे त्यांनी अश्वस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना मिटलेली आहे. केवळ खत, बियाणांचा पुरवठाच नाही तर उत्पादन वाढीसाठी त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला दिला आहे.

यंदा उत्पादन वाढीची संधी

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारही अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमाला निसर्गाची साथ मिळाली तर शेती तोट्यात नाही उलट शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल अशीच शेती आहे. गतवर्षी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. यंदा आता पाऊसकाळ चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनो सर्वतोपरी प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पाण्याची उपलब्धताच महत्वाची

पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे फळबागांचे उत्पादन वाढत आहे. एकाने शेती प्रयोग यशस्वी केला म्हणजे प्रत्येकाचाच होईल असे नाही. शेतकऱ्यांनी जिरायत भागातील पाण्याची उपलब्धता, एकरी उत्पादन आणि त्यासाठी लागणारे कष्ट या सर्व बाबींचा अभ्यास करुन पीक पध्दती ठरविणे गरजेचे आहे. अन्यथा उत्पादन तर सोडाच नुकसानीचाच सामना करावा लागेल असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. पाणी हे सगळ्यांचेच आहे. त्याचा योग्य़ वापर झाला तरच उद्देशही साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

सोमवारी 5 जिल्ह्यांची खरीप आढावा बैठक

सध्या खरीप हंगामावर कृषी विभाग आणि प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. शेतकऱ्यांना वेळेत खत आणि बियाणे पुरवठा तसेच वाढीव उत्पादनाच्या अनुशंगाने मार्गदर्शन आदी कार्यक्रम राबिवणे गरजेचे आहे. सध्या जिल्हानिहाय खरीप हंगाम आढावा बैठका पार पडत आहे. यामधून अंदाजित बियाणे, खते ठरवले जाते. त्यानुसार पुरवठा करुन शेतकऱ्यांची सोय केली जाते. त्याच अनुशंगाने सोमवारी 5 जिल्ह्यातील आढावा बैठक पार पडणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.