Department of Agriculture : रब्बीत निसर्गाचा लहरीपणा, खरिपात भासणार खताचा तुटवडा, सांगा शेती करायची कशी?

रब्बीत पेरणीपासून सुरु असलेले विघ्न आता हंगाम मध्यावर आला तरी कायमच आहे. आता हे कमी म्हणून की काय शेतकऱ्यांच्या चिंतेत अणखीन भर टाकणारी बाब कृषी विभागाने समोर आणली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या खत पुरवठा आढावा बैठकीत आगामी खरिपात युरियाचा तुटवडा भासणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Department of Agriculture : रब्बीत निसर्गाचा लहरीपणा, खरिपात भासणार खताचा तुटवडा, सांगा शेती करायची कशी?
रासायनिक खत, संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:56 AM

पुणे : खरीप हंगामात अधिकच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली होती. त्याची कसर आता (Rabi Season) रब्बी हंगामात भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. रब्बीत पेरणीपासून सुरु असलेले विघ्न आता हंगाम मध्यावर आला तरी कायमच आहे. आता हे कमी म्हणून की काय शेतकऱ्यांच्या चिंतेत अणखीन भर टाकणारी बाब (Agricultural Department) कृषी विभागाने समोर आणली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या खत पुरवठा आढावा बैठकीत आगामी खरिपात (Shortage Of Fertilizer) युरियाचा तुटवडा भासणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डीएपी च्या सततच्या बदलत्या दरामुळे खत कंपन्यांना हे खत पुरवण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे खताचा तुटवडा भासणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रब्बी हंगामात एक ना अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भविष्यात काय मांडून ठेवले आहे हा प्रश्नय..

शेतकऱ्यांकडून मागणी त्याच खताचा तुटवडा

पिकांची जोमात वाढ व्हावी व उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात 10:26:26 आणि 12:32:16 या खतांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश आणि फॉस्फेरिक अॅसिडच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खत कंपन्यांना पोटॅश मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अशीच परस्थिती कायम राहिली तर दरात वाढ आणि मागणीनुसार पुरवठाही होणार नसल्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

काय आहे उपाययोजना?

खताच्या पुरवठ्यावरच खरीप हंगामातील उत्पादन हे अवलंबून आहे. यंदा तर दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परस्थितीमध्ये आगामी हंगामात खताचा तुटवडा भासला तर शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत खताचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. शिवाय याकरिता पाठपुरावा करुन कंपन्यांनी कुठल्याही खताचा साठा न करता वेळोवेळी त्याचा पुरवठा केला तर शेतकऱ्यांना अधिक लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने प्रयत्न करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांकडे इतर खताचे कोणते पर्याय?

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी मिश्र खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वापर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलीच ही मिश्र खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

धान खरेदी केंद्राचा आधार तात्पुरताच, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांच्या काय आहेत समस्या? वाचा सविस्तर

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणचा गलथान कारभार

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.