PM Kisan | ही 4 कामे झटपट उरकवा, नाहीतर खात्यात येणारा पैसा विसरा
PM Kisan | पीएम किसान योजनेचा 13 वा आणि 14 वा हप्ता जमा झाला आहे. या दरम्यान काही शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली. त्यांना काही कागदपत्रे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याचा फटका बसला. आता देशातील 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 15 वा हप्ता जमा होण्याची प्रतिक्षा आहे. पण त्यासाठी हे काम अगोदर करावे लागेल.
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभर्थ्यांना सध्या 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 27 जुलै रोजी हा हप्ता एक कळ दाबून जमा केला होता. राजस्थानमधील सीकर येथे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्यातंर्गत 17000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम 8.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पोहचली होती. तर त्यापूर्वी 13 वा हप्ता फेब्रुवारी 2023 मध्ये जमा करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर ही रक्कम जमा होणार नाही.
कधी होईल हप्ता जमा
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसान पोर्टलने शेतकऱ्यांना ही 4 महत्वपूर्ण काम करण्यास सांगितले. आहे. ते केले तर वेळेत त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. या योजनेचा 15 हप्ता याच महिन्याच्या अखेरीस अथवा 30 नोव्हेबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी या वर्षात 13 वा आणि काही महिन्यांपूर्वी 14 वा हप्ता जमा झाला आहे.
या बदलाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देऊ शकतात. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा 2024 निवडणुकीसाठी केंद्र सरकार ही भेट देऊ शकते. एका सरकारी अधिकाऱ्यानुसार, पीएम किसान योजनेत वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम वाढून ती 8000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. चार टप्प्यात हा हप्ता जमा होऊ शकतो. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर 20,000-30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल.
ही चार कामे आताच उरकून टाका
- आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाले की नाही ते तपासा
- बँक खाते NPCI सोबत संलग्न असणे आवश्यक
- केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे
- भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक दस्तवेजांचे सत्यापन आवश्यक आहे
- तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते पण तपासा