Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojna : योजनेचा लाभ मिळाला नाही मग, चिंता सोडा अन् बातमी वाचा

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील 10 हप्ता वितरीत होऊन 2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. असे असतानाही अजूनही अनेकांच्या बॅंक खात्यावर निधी जमा झालेला नाही. शिवाय यापूर्वी हप्ता जमा झाला पण 10 वाच हप्ता का जमा नाही किंवा अनेक शेतकऱ्यांचा अजून या योजनेत सहभागही नाही. एवढेच नाही तर अनेक अपात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे.

PM Kisan Yojna : योजनेचा लाभ मिळाला नाही मग, चिंता सोडा अन् बातमी वाचा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 9:33 AM

जालना : (PM Kisan Sanman Yojna) पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील 10 हप्ता वितरीत होऊन 2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. असे असतानाही अजूनही अनेकांच्या बॅंक खात्यावर निधी जमा झालेला नाही. शिवाय यापूर्वी हप्ता जमा झाला पण 10 वाच हप्ता का जमा नाही किंवा अनेक (Farmer) शेतकऱ्यांचा अजून या योजनेत सहभागही नाही. एवढेच नाही तर अनेक अपात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता या सर्व गोष्टींचा निपटारा होणार आहे. अहो खरचं, आता दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी (Central Government) केंद्र सरकारने भन्नाट उपक्रम राबवण्याचे धोरण ठरवले आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनाला याबाबत परिपत्रक देण्यात आले आहे. त्यामुळे पात्र असूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचा तर प्रश्न मार्गी लागणार आहेच शिवाय ज्यांनी अनाधिकृतपणे लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे वसुलही होणार आहे.

नेमका कसा होणार निपटारा?

पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील प्रलंबित अर्जाचा डाटा दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याची माहिती मोबाईल एसएमएस द्वारे दिली जाणार आहे. सदरील डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीमध्ये कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. हा कॅम्प केवळ एका दिवसापूरताच नाही तर जोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत आयोजन केले जाणार आहे. या दरम्यान अर्जदारांना केवळ सातबारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबूक हे आणावे लागणार आहे. हे दुरुस्तीचे काम कृषी व ग्रामविकास विभागाच्यावतीने केले जाणार आहे.

अपात्र लाभार्थ्यांकडून होणार वसुली

आतापर्यंत योजनेत अनियमितता झाली आहे. जे लाभार्थी नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये अनेकजण असे आहेत ज्यांनी आयकर अदा करुनही योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता स्थानिक पातळीवरील कॅम्प दरम्यानच हे पैसे वसुल केले जाणार आहेत. हे काम जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात होणार असून महसूलचे अधिकारी पार पाडणार आहेत. वसुल झालेला निधी तात्काळ केंद्र शासनास जमा करावा लागणार आहे.

कृषी मित्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांची तपासणी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ हा गरजू शेतकऱ्यांना मिळावा हा उद्देश आहे. मात्र, स्थानिक पातळीवर अनियमितता झाल्याने अनेकजण हे आयकर भरुनही योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांची तपासणी ही कृषी मित्राच्या माध्यमातून होणार आहे. कारण कृषी मित्राला स्थानिक पातळीवरची माहिती असून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सेवक हे क्रॉस चेक करणार आहेत. यानंतर भौतिक तपासणी फॉर्म हा तहसील कार्यालयात जमा करावा लागणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्याची सर्वकश माहिती ही आता प्रशासनाकडे राहणार आहे.

संबंधित बातम्या :

Red Chilly : मिरचीचे उत्पादन घटले दर वाढले, लाल मिरचीच्या आगारात काय आहे चित्र ?

FRP : स्वाभिमानीचा एकाकी लढा, एफआरपी निर्णयाविरोधात आंदोलन सुरुच

e-Shram Yojana : 25 कोटी कामगारांची नोंदणी मात्र, योजनेचा लाभ नेमका कुणाला? वाचा सविस्तर

पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो.
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना
डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना.
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी
नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी.
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.