PM Kisan : शेतकऱ्यांनी करावे हे महत्त्वाचे काम, अन्यथा पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा होणार नाही
पुढच्या महिन्यात पीएम किसानचा चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लोकप्रीय झाली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हप्ते दिले आहेत. १४ वा हप्ता केव्हा मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पुढच्या महिन्यात पीएम किसानचा चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. ८ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
बँक खाते आधारशी लिंक करावे
१४ व्या हप्त्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. आपला अकाउंट नंबर आधारशी लिंक करावा लागेल. एनपीसीआयशी संबंधित बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आधार नंबर आणि एनपीसीआय त्वरित लिंक करून घ्यावे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाता सुरू करता येईल
१४ वा हप्ता फक्त आधार आणि एनपीसीआयशी संबंधित बँक खात्यात जमा होईल. केंद्र सरकारने पोस्ट विभागाच्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार आणि एनपीसीआयशी जोडण्याचे काम सोपे केले आहे. शेतकरी पोस्टात जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन डीबीटी लिंक खाता खोलू शकतात.
https://resident.uidai.gov.in/bank-mapper येथे जाऊन आपले डिटेल्स टाकल्यानंतर बँक अकाउंटची माहिती कम्प्यूटर स्क्रीनवर दिसेल.
एनपीसीआयने खाता करा लिंक
शेतकरी आपला बँक खाता एनपीसीआयशी लिंक करू इच्छित असतील तर त्यांनी आपली कागदपत्र बँकेत किंवा पोस्टात जमा करावेत. डिटेल्स मिळाल्यानंतर बँक शाखा ग्राहकाचा खाता एनपीसीआय मॅपरशी जोडतील. एनपीसीआय मॅपर आधार नंबर दाखवेल. ग्राहक एका खात्याला आधारशी लिंक करू शकतात.
२७ फेब्रुवारी २०२३ रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा हप्ता आला होता. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार ६ हजार रुपयांची वार्षिक मदत करते. त्यात यंदापासून ६ हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे. वार्षिक १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.