Mango : अवकाळीनंतर वाढीव तापमानाचा धोका, उन्हामुळे भाजलेल्या आंब्याचे होते तरी काय ?
संकटे आली की चोहीबाजूंनी येतात. दरवर्षी फळांच्या राजा हापूसमुळे आंबा उत्पादकांचा तोरा काही वेगळाच असतो. हापूस बाजारात येताच ग्राहकांची मागणी आणि उत्पादकांना येणारे महत्व हे काही वेगळेच असते. पण यंदा कोकणातील चित्र हे वेगळेच आहे. हंगामाच्या सुरवातीपासून केवळ नुकसानीचाच सामना आंबा उत्पादकांना करावा लागलेला आहे. अवकाळी, ढगाळ वातावरणामुळे फळ बागांवर परिणाम झाला होता.
रत्नागिरी : संकटे आली की चोहीबाजूंनी येतात. दरवर्षी फळांच्या राजा हापूसमुळे आंबा उत्पादकांचा तोरा काही वेगळाच असतो. (Hapoos Mango) हापूस बाजारात येताच ग्राहकांची मागणी आणि उत्पादकांना येणारे महत्व हे काही वेगळेच असते. पण यंदा (Kokan) कोकणातील चित्र हे वेगळेच आहे. हंगामाच्या सुरवातीपासून केवळ नुकसानीचाच सामना आंबा उत्पादकांना करावा लागलेला आहे. अवकाळी, ढगाळ वातावरणामुळे फळ बागांवर परिणाम झाला होता. मात्र, औषध फवारणी आणि विविध उपाययोजना करुन शेतकऱ्यांनी बागा जोपासल्या. पण ज्याची भीती होती तेच अखेरच्या टप्यात होत आहे. आता वाढीव (Temperature) तापमानामुळे थेट फळगळती होऊ लागली आहे. पूर्ण वाढ होण्याअगोदरच ही प्रक्रिया होत असल्याने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान सुरु झाले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील आंबा उत्पादन घेतले जात आहे. पण तापमानाचा पारा वाढत असल्याने आंबा गळती सुरु झाली आहे.
बाधित आंबे बाजूला काढणेच योग्य
वाढत्या तापमानामुळे आंबागळ होते. परिपक्व होण्यापूर्वीच आंबागळ झाली तर तो जमिनीवर पडून भाजतो. 32 अंशापेक्षा अधिकवर पारा गेला तर ही परस्थिती ओढावते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून 40 अंशावर तापमान असल्याने आंबा गळतीचे प्रमाण वाढलेले आहे. शिवाय उन्हामुळे भाजलेला आंबा हा वेचून वेगळीकडे ठेवावा लागतो अन्यथा त्यामुळ इतर आंब्याचे नुकसान होते. त्यामुळे उत्पादकांना भर उन्हामध्ये गळती झालेला आंबा वेचून ठेवावा लागत आहे.
भाजलेल्या आंब्याचे व्यवस्थापन अन्यथा होईल नुकसान
गळती झालेला आंबा जमिनीवर पडतो आणि वाढत्या तापमानामुळे तो पूर्णपणे भाजतो. भाजलेला आंब्याच रोगराई निर्माण होते. म्हणूनच इतर चांगल्या आंब्यापासून त्याला वेगळे केले तरच नुकसान टळणार आहे. यामुळे शेतकरी नासलेला आंबा थेट जमिनीत पुरतात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जमा करुन ठेवतात. कारण हा आंबा लोंच्यासाठीही उपयोगी नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरीचा पारा 40 अंश सेल्सिअसवर
राज्यातच तापमानाचा पारा वाढतोय. त्याचबरोबर कोकणामध्येही उष्णतेची लाट पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत केवळ वाढत्या उन्हाचा परिणाम काय होईल याचा विचार केला जात होता. पण आता प्रत्यक्ष आंब्याचे नुकसान सुरु झाले आहे. वाढत्या उन्हामुळे आंबा झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय परिपक्व होण्याअगोदरच आंबा गळती सुरु होते. मध्यंतरीची अवकाळी आणि आता वाढते तापमान सर्वकाही नुकसानीचे ठरत आहे. काढणीपूर्वीच झाडाखाली आंबा फळाचा सडा पडत आहे. त्यामुळे हा आंबा पिकतही नाही आणि विकतही नाही. आतापर्यंत अवकाळी आणि ढगाळ वातावरणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हजारोंचा खर्च केला आहे. असे असूनही फळ पदरात पडतनाही नुकसानीने पाठ सोडलेली नाही.
संबंधित बातम्या :
Washim : खरिपातील दोन्ही शेतीमालाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांचे ‘टायमिंग’ चुकले
YAVATMAL मध्ये खाणीतील धुळीने पीक काळवंडली, शेतकरी चिंतेत; आंदोलनाचा इशारा
Mango cultivation : आंबा लागवडीच्या योग्य नियोजनाने होईल उत्पादनात दुप्पट वाढ, जाणून घ्या सर्वकाही