बँकेतील नोकरी सोडली, सुरू केली शेती; आता उगवतो वर्षाला एक कोटी रुपयांचा भाजीपाला
अशा तीन व्यक्तींबद्दल सांगणार आहोत जे जमीन किरायाने घेऊन भाजीपाल्याची शेती करत आहेत. ते आता दुसऱ्यांना नोकरी देत आहेत.
नवी दिल्ली : शेतीला व्यवसाय म्हणून पाहा. तिथं काही कमी नाही. देशातील कित्तेक शेतकरी लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपये कमवत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धती सोडून फळं, फुलं आणि भाजीपाल्याची शेती करतात. यामुळे शेती दिवसेंदिवस व्यवसाय होत आहे. शिकलेले युवकही शेतीत इंटरेस्ट घेत आहेत. अशा तीन व्यक्तींबद्दल सांगणार आहोत जे जमीन किरायाने घेऊन भाजीपाल्याची शेती करत आहेत. ते आता दुसऱ्यांना नोकरी देत आहेत.
शेती करण्याचे स्वप्न साकार
हे तिन्ही मित्र बिहारच्या पाटण्याचे रहिवासी आहेत. तिघांनी मिळून पाटण्यावरून २० किलोमीटर अंतरावर बिहटा येथे शेती किरायाने घेतली. या शेतकऱ्यांची नावं आहेत वियन राय, राजीव रंजन शर्मा आणि रंजीत मिश्रा. हे तिघेही भाजीपाल्याची विक्री करून ५० लाख रुपयांचा नफा कमवत आहेत. विनय यांनी सांगितलं की, ते सुमारे ९ वर्षांपूर्वी मुंबईत बँकेत नोकरी करत होते. परंतु, त्यांचे स्वप्न शेती करण्याचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून २०१४ मध्ये शेती करणे सुरू केले.
२५ मजुरांना दिला रोजगार
शेतीत २० ते २५ मजूर काम करतात. या तिघांनी शेतीला व्यवसायात रुपांतरित केले. विनय यांनी नोकरी केली नसती, तर फक्त आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं असतं. परंतु, आता शेतीत दुसऱ्यांना रोजगार देत आहे. चार वर्षांपूर्वी विनयने शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला गोबी, काकडी आणि ब्रोकलीची शेती करत होते. यातून चांगले उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्यांनी शेती वाढवली. आता तीन मित्र मिळून हिरव्या भाजीपाल्याची शेती करत आहेत. हे तिन्ही मित्र वर्षभरात एक कोटी रुपयांचा भाजीपाला विकतात.
तर वाढू शकते शेतकऱ्यांचे उत्पन्न
या भागात कोल्ड स्टोअर, पॉलीहाऊस आणि ग्रीन हाऊसची कमतरता आहे. सरकारने अनुदान देऊन वाढ केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी वाढू शकते. विनय रायचे मित्र रंजीन मिश्र म्हणतात, वर्षभरात तीन प्रकारचे उत्पन्न ते काढतात. दहा एकर जागेत ते काकडीचे उत्पन्न घेतात. याशिवाय टरबूज आणि खरबूजचीही शेती ते करतात. गेल्या वर्षी त्यांनी २५ लाख रुपयांची पपई विक्री केली होती. याशिवाय गोबी, ब्रोकली यातूनही ते लाखो रुपयांची कमाई करतात.