पुणे : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे म्हणून केवळ शेती या मुख्य व्यवसयावरच नाही तर इतर जोड व्यवसयावरही (Central Government) केंद्र सरकारचे लक्ष आहे. त्याचअनुशंगाने आता (Animal Husbandry Business) पशूपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना योजनांचा लाभ मिळा याकरिता ‘ई-गोपाल’ अॅप कार्यन्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून जनावरांचे टॅगिंग करता येणार आहे. हेच टॅगिंग आता जनावराचे आधार कार्ड राहणार आहे. यामुळे एका क्लिकवर टॅगिंग केलेल्या जनावराची सर्व माहिती मिळणार आहे.
ज्या प्रमाणे आधार कार्डच्या माध्यमातून व्यक्तीची सर्व माहिती मिळते अगदी त्याप्रमाणेच ‘ई-गोपाल’ अॅप वर जनावरांचे टॅगिंग केले की माहिती मिळणार आहे. येथे नोंदणी म्हणजे जनावराचे देखील आधार कार्ड काढल्यासारखेच आहे. त्यामुळे प्रत्येक गाई-म्हशींसाठी एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या आधार कार्डमुळे लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय साह्य इतर कामेही सहज करता येणार आहेत. या टॅगिंगमध्ये जनावरांच्या कानामध्ये काही ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग ठेवला जात आहे. या टॅगवर छापील 12 अंकी आधार क्रमांक आहे. आधार कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जनावरांचे टॅगिंग करण्याचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून पशुसंवर्धन विभागातर्फे राबवला जात आहे.
जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे या टॅगिंगचे काम सोपवण्यात आले आहे. यामध्ये पशूपालकाचे नाव, जनावराचे वय, किती येत झाले, कोणते आजार याची सर्व माहिती राहणार आहे. रत्नागिरी तालुक्याच 28 हजार 577 जनावरांचे म्हणजे 97 टक्के टॅगिंगचे काम झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.
पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘ई-गोपाल’ अॅप कार्यान्वित केले असून, त्या अंतर्गत जनावरांना टॅगिंग करण्यात येत आहे. टॅगिंग त्या जनावरांचे हे आधार कार्ड राहणार असून, या कार्डद्वारे एकाच क्लिकवर त्या जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून टॅगिंग करून पशू आधार कार्ड तयार केले जात आहे.
* जनावराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
* जनावराची चोरी झाल्यास शोधाला उपयुक्त
* आवश्यक असलेला दाखला मिळण्यास मदत
* जनावराचा मृत्यू झाल्यास भरपाईस मदत
* विक्रीमध्ये आधार कार्ड महत्त्वाचे ठरणार