Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल

केवळ पोषक वातावरणामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल झाला नाही तर वाढीव उत्पन्नाच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी आपले धोरण ठरवले आहे. त्यामुळे मराठवाड्यात घेतल्या जाणारे करडई आणि सूर्यफुलाचे क्षेत्रही कमालीचे घटले आहे. तेलाचे दर वाढत असले तेलवर्गीय पिकांना अधिकचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला आहे. काही तालुक्यांमध्ये तर ही पीके शून्य टक्क्यांवरच असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन आणि हरभरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Rabi Season : उत्पादनवाढीसाठी तेलवर्गीय पिकांकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष, पीक पध्दतीमध्ये असा हा बदल
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी तेलवर्गिय पिकांकडे दुर्लक्ष करुन नगदी पिकांवर भर दिला आहे.
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 3:03 PM

औरंगाबाद : केवळ पोषक वातावरणामुळे यंदाच्या (Rabi Season) रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल झाला नाही तर वाढीव उत्पन्नाच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी आपले धोरण ठरवले आहे. त्यामुळे (Marathwada) मराठवाड्यात घेतल्या जाणारे करडई आणि सूर्यफुलाचे क्षेत्रही कमालीचे घटले आहे. तेलाचे दर वाढत असले (Oil grade crops) तेलवर्गीय पिकांना अधिकचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला आहे. काही तालुक्यांमध्ये तर ही पीके शून्य टक्क्यांवरच असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन आणि हरभरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शासनाने तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात असलेली संधी विचारात घेऊन खाद्यतेल धोरणाला अनुसरून यंदा महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) अभियानाच्या माध्यमातून करडईचे नामशेष होणारे क्षेत्र जगविण्यासाठी यंदा शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम राबवून करडई लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. असे असतानाही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

तेलवर्गीय पिकांकडे दुर्लक्ष का?

पूर्वी रब्बी हंगामात ज्वारीबरोबर करडईचे पीक घेतले जात असे, तर शेतकरी खरिपासह रब्बीत सूर्यफूल घेत होते. मात्र आता करडई व सूर्यफूल पिके घेण्याकडे सर्वच शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.करडई व सूर्यफूलपासून उत्पादित तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या करडई व सूर्यफूलास अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाय गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन हेच मुख्य पीक म्हणून समोर येत आहे.

करडई पिकातील काय आहेत अडचणी

पूर्वी आहारामध्ये करडईचे तेल असणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आता हीच करडई दुर्मिळ झाली आहे. करडई, सूर्यफुलाची जागा आता सोयाबीन आणि हरभऱ्याने घेतली आहे.त्यातच करडई पिक घेतल्यास ती मनुष्यबळाअभावी काढणीला अवघड ठरत आहे. तसेच यांत्रिक पद्धतीने त्याच्या काढणीवर मर्यादा येऊन मजुरांवर करडई पिकाच्या सोंगणीसाठी अवलंबुन राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी हरभरा, गहू पिकांस पसंती दिली. करडईच्या परिपक्वतेचा कालावधी ज्वारी, हरभऱ्यापेक्षा अधिकचा आहे.

काय आहे कृषी विभागाचा दावा?

करडई हे सर्वात फायदेशीर पीक समजले जात होते. मात्र, सध्या वातावरणातील बदल, रोगांचा प्रादुर्भाव शिवाय या पिकांच्या स्पर्धेत इतर पिकांचे दर, काढणी प्रक्रिया आणि पोषक वातावरण हे सोयाबीन आणि हरभऱ्याला मिळत आहे. शिवाय तेलाचे दर वाढत असले तरी तेलवर्गिय पिकांना अपेक्षित दर मिळत नाही. तेलबियांवर प्रक्रिया केल्यानंतरच हे दर वाढतात पण तेलवर्गिय पिके हा कवडीमोल दरात खरेदी केली जातात हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे करडई, सूर्यफुलाच्या क्षेत्रात कमालीची घट पाहवयास मिळत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

Grape : कृषी विभागामुळे द्राक्ष निर्यातीची नोंदणी वाढली पण निसर्गाने सर्व डावच मोडला, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे चित्र?

Onion Crop : ‘भीम शक्ती’ने पाच एकरात चौपट उत्पन्न मिळणार, कांदा बियाणे ठरले टर्निंग पॉईंट..!

Heat Wave: वाढत्या उन्हाच्या झळा बेतल्या मुक्या प्राण्यांचा जीवावर, उष्मघाताने Baramati मध्ये शेळ्या दगावल्या

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.