कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी ,पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल पाहायला मिळतोय.

कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात टोमॅटोचा लाल चिखल, किलोला एक ते दीड रुपया दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हतबलता
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 5:09 PM

नाशिक: राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी ,पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल पाहायला मिळतोय. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत आवक अधिक येत असल्याने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोला मातीमोल दर मिळाला आहे. कमी दर मिळाल्यानं संतप्त टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकल्याने येवला-नगर राज्य मार्गावर टोमॅटोचा लाल चिखल पाहायला मिळाला.

तरुण शेतकऱ्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकले

येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याने 80 हजारहून अधिक खर्च करून एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. आदित्य जाधव यांना त्यातून 15 हजार रुपयांच्या जवळपास रक्कम हातात आली.

किलोला एक ते दीड रुपया दर

दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव कोसळत गेल्याने आदित्य जाधव या शेतकऱ्याला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत 20 किलोच्या कॅरेट टोमॅटोला भाव वीस ते तीस रुपये मिळाले. म्हणजेच एका किलोला जवळपास एक ते दीड रुपये इतका मातीमोल बाजार भाव मिळाला. या परिस्थितीमुळे उत्पादन खर्च तर दूरच तोडणी आणि वाहतूक खर्चही अर्धा मिळणार नसल्याने संतप्त होत या शेतकऱ्यांने येवला-नगर राज्य मार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला. वाहनांच्या खाली टोमॅटो दबल्याने रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत होती .

देशांतर्गत मागणी घटली

नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. या कारणामुळे टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसते आहे. लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 60 ते 100 रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय. कमी दरामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक, मार्केटमधील चढ-उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे.

केंद्राकडं पाठपुरावा सुरु

जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगांव बाजार समितीकडे मागणी केलीय. लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार नव्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेल्या डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश यासह आखाती देशात टोमॅटो कसा जास्त निर्यात करता येईल यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे. टोमॅटो जास्तीजास्त निर्यात आखाती देशात कशी करतात येईल याकडे राज्य व केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

इतर बातम्या:

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

Tomato price down issue Yeola farmer facing problems due low rate to tomato

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.