हवामान बदलाचा शेतीवर परिणाम, पीकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत
Agricultural News : हवामान बदलाचा फटका शेतीला बसला आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडून अनुदान जाहीर करण्याची विनंती केली आहे.
गणेश सोलंकी, बुलढाणा : संकट जणू काही शेतकऱ्यांच्या (Agricultural News) पाचवीलाच पुजलय की काय, असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात (maharashtra news)उभा राहिला आहे. त्याच कारणही तसचं आहे. आधी अस्मानी संकट, नंतर सुलतानी संकट, याच फेऱ्यात शेतकरी यंदा अडकताना दिसत आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेली टोमॅटोची बाग, भर उन्हात पाणी देऊन मशागत करून उभी केली. मात्र एन उत्पन्नाच्या काळात टोमॅटोला फक्त दीड ते दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने शेतकरी बुलढाणा (buldhana farmer news) जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पुन्हा एकदा अडचणीत आला आहे अशी माहिती मधुकर शिंगणे यांनी दिली आहे.
टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत आहे
बुलढाणा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. किलोला दीड ते दोन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटो तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो शेतातच वाढत्या तापमानामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी सोडून दिली आहे. हजारो रुपये टोमॅटो लागवडीसाठी खर्च करूनही शेतकऱ्यांना भावा अभावी शेतातच टोमॅटो सोडून द्यावी लागत आहे. तर कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आला आहे. त्यामुळे आता अशा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर करावं अशी मागणी शेतकरी नेते, रविकांत तुपकर यांनी केली आहे.
अवकाळी पावसानं केलं नुकसान
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे फळांच्या बागांचं आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान आहे. त्यामुळं अनेक पीकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. लोकं शेतकरी पावसाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत.