या कारणामुळे महाराष्ट्रात टोमॅटोचे दर वाढणार, टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतला निर्णय

देशात सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरात टोमॅटो इतका महाग झाला आहे की, लोकांनी टोमॅटो खरेदी करणं बंद केलंय.

या कारणामुळे महाराष्ट्रात  टोमॅटोचे दर वाढणार, टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी घेतला निर्णय
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 11:46 AM

नागपूर : टोमॅटोचे दर (tomato rate increased) नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक टोकाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता टोमॅटो खरेदी करणार आहे. देशातल्या बऱ्याच भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांपर्यंत गेले आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे सामान्य लोकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. या कारणामुळेचं केंद्र सरकार (central governmet) नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक महासंघाकडून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. खरेदी केलेले टोमॅटो दिल्ली, कोलकाता, कानपूर आणि पाटण्याच्या बाजारात विक्री होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोचे दर आणखी वाढण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. मान्सून निश्चित वेळेत दाखल न झाल्यामुळे टोमॅटोचे दर (nagpur news) वाढले आहेत.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा आणि रब्बी पिकाचं नुकसान झालं आहे. एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर रब्बी हंगामातील सगळ्या पिकांचं नुकसान झालं आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पाऊस देशात दाखल होतो. परंतु यंदा एक महिना मान्सून पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर अधिक झाला आहे. शेतीत भाजीपाला पिकला नसल्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याचा दर अधिक झाला आहे. पुढच्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर कमी येतील असं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मान्सून सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समजली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.