Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून

सध्या अवकाळी आणि ढगाळ वातावरण नसल्याने हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात हळद काढणीची लगबग सुरु झाली आहे. वर्षभर वातावरणातील परिणाम हळद उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार हे निश्चित आहेच पण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची.

Turmeric Crop: वर्षभर प्रयत्नांची पराकष्टा, आता सर्वकाही दरावर अवलंबून
हळद काढणीला सुरवात झाली असून यंदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे वाढीव दराची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 11:05 AM

नांदेड : उत्पादन वाढीसाठी सर्वकाही करुनही अखेरीस निसर्गावरच शेती अवलंबून आहे हे यंदा अधिक प्रकर्षाने जाणवले आहे. (Untimely Rain) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकावर झालेला आहे. सध्या अवकाळी आणि ढगाळ वातावरण नसल्याने हिंगोलीसह (Nanded) नांदेड जिल्ह्यात (Turmeric Crop) हळद काढणीची लगबग सुरु झाली आहे. वर्षभर वातावरणातील परिणाम हळद उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार हे निश्चित आहेच पण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची. यंदा खरीप हंगामातील पिकांची अवस्था तशीच झाली होती. मात्र, वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी आता हळदीच्या दराबाबतही कृपादृष्टी रहावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त आहेत. ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे हळदीची वाढ खुंटली होती असे असतानाही काढणी कामे सुरु झाली आहेत.

वातावरण बदलाचा परिणाम थेट पिकावर

नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. शिवाय बाजारपेठही जिल्ह्यातच उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा भर या पिकावर राहिलेला आहे. क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या वातावरणाचा परिणाम हळद या पिकावरही झाला आहे. पावसाचे तसेच गोदा नदीचे बॅकवॅाटरचे पाणी थेट मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचलेले होते. त्यामुळे पहिल्या एक-दोन दिवसांमध्ये हळद ही पिवळी पडली तर अधिकचा काळ पाणी साचून राहिल्याने कंदमुळेही सडली होती. त्यामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.

तरच वर्षभराच्या कामाचे फलीत

उत्पादनात घट म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला तर दर वाढणार हे बाजारपेठेचे गणित आहे. यंदा दीर्घकाळ ढगाळ आणि थंड वातावरण राहिल्याने हळदिची वाढ पुरेशी झालेली नाही, त्यातून हळदीच्या उत्पादनात सरासरीच्या तुलनेत घट जाणवत असल्याचे उत्पादक शेतकरी सांगतायत. त्यामुळे वर्षभर राबून वाढवलेल्या हळदीला आता बाजारात काय भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. हळदीला लागणाऱ्या उत्पादन खर्चाची गोळाबेरीज केली तर हळद प्रती क्विंटल दहा हजार रुपये विकल्या गेली तरच हे पीक यंदा परवडणारे ठरणार आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर आणि कापसापाठोपाठ हळदीलाही योग्य दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

राज्यात सर्वाधिक लागवड हिंगोली जिल्ह्यात

हळदीची बाजारपेठ आणि लागवड क्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर आहे. येथील बाजारपेठेतून गुजरात, कर्नाटक या ठिकाणी हळदीची निर्यात केली जाते. तर राज्यातील 84 हजार लागवडी क्षेत्रापैकी एकट्या हिंगोली जिल्ह्यात 49 हजार हेक्टरावर हळदीची लागवड केली जात आहे. योग्य व्यवस्थापन येथील शेतजमिन यामुळे उत्पादकताही मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत मराठवाड्यात हळद पिकाचे स्वरुप बदलताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

केजच्या शेतकऱ्याने करुन दाखवले तुम्हीही करा ‘गाजरा’ची शेती, 3 महिन्याचे पीक अन् लाखोंची कमाई

किसान रेलमुळे चिक्कूला मिळाली बाजारपेठ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् खर्चात बचत

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....