E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

खरीप हंगामात ज्या प्रमाणे 'ई-पीक पाहणी'चा गाजावाजा झाला होता त्या तुलनेत रब्बीत या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. दोन वेळा मुदतवाढ करुनही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय जनजागृतीकडे कृषी आणि महसूल विभागाकडूनही कानडोळा झाला असल्याने एका जिल्ह्यामध्ये 25 हजाराहून अधिकची नोंद झालेली नाही.

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 1:14 PM

लातूर : खरीप हंगामात ज्या प्रमाणे  ‘ई-पीक पाहणी’चा गाजावाजा झाला होता त्या तुलनेत (Rabi Season) रब्बीत या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. दोन वेळा मुदतवाढ करुनही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय जनजागृतीकडे (Agricultural Department) कृषी आणि महसूल विभागाकडूनही कानडोळा झाला असल्याने एका जिल्ह्यामध्ये 25 हजाराहून अधिकची नोंद झालेली नाही. शिवाय आता या (E-Pik Pahani) अॅप बद्दल शेतकऱ्यांना माहिती देखील झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिलेला आहे. आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून किती शेतकरी आपल्या पिकांची नोंद या माध्यमातून करणार हे पहावे लागणार आहे. भविष्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तर ही नोंदच शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. शिवाय खरीप हंगामात याचे महत्व लक्षात येऊनही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात तरी दुर्लक्ष

सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. काही भागामध्ये तर हरभरा पिकाची काढणी सुरु झाली आहे. असे असतानाही कृषी विभागाला ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंद करुन घ्या असे आवाहन करावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामापासून महसूल कर्मचारी तलाठी यांची भूमिका शेतकरीच बजावत आहे. आपल्या पिकाची नोंद आपणच या अॅपच्या माध्यमातून करुन नुकसानभरपाईला पात्र राहत आहे. खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता. त्यामुळे रब्बीमध्ये सहभाग वाढेल अशी आशा होती पण शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

का झाली नोंदणी कमी?

खरीप हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा धोका असतो. मात्र, रब्बी हंगामात वातावरण हे कोरडे असते शिवाय उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा मानला जातो. त्यामुळेच खरीप हंगामात 84 लाख शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. सर्वाधिक शेतकरी हे नांदेड जिल्ह्यातील सहभागी झाले होते.पण रब्बी हंगामात वातावरण कोरडे असून पिकांना धोका नसतो म्हणून शेतकरी नोंदणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.

आता उरले दोनच दिवस

रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यल्प सहभाग पाहून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. गेली दोन महिने कृषी विभागाकडडून जनजागृती केली नाही तर आता अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का असा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या  :

कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं ‘भाव’? नव्याने आवक अन् विक्रमी दरही

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.