Yewala: दोन तरुणांच्या प्रयत्नाने दरवळला उत्पादन वाढीचा ‘सुगंध’, जिरेनियम शेतीमधून साधली किमया..!
शेती व्यवसयातून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जगणेही मुश्किल होते असे म्हणणाऱ्यांना येवला तालुक्यातील अनिल धनगे व त्याचा मित्र किरण पवार यांनी दाखवून दिले आहे की, शेतीमधून लाखोंचे उत्पन्न मिळवता येते ते. यासाठी आवश्यक आहे तो बदल. पारंपरिक शेतीवर केवळ उदरनिर्वाह होऊ शकतो पण योग्य नियोजन आणि विकेल तेच पिकेल हे धोरण ठरवून या दोघांनी 5 एकरामध्ये सुगंधित जिरेनियम रोपांची लागवड केली होती.
लासलगाव : मागणी त्याचेच उत्पादन घेतले तर काय होऊ शकते येवला तालुक्यातील दोन (Young Farmer) तरुण शेतकरी मित्रांनी दाखवून दिले आहे. आहे (Farming) शेती म्हणून करण्यात अर्थ नाही तर अत्याधुनिक पध्दतीने हा व्यवसाय केला तर उत्पादनात वाढ आणि मर्यादित कष्टही असा दुहेरी उद्देश तालुक्यातील अंदरसूल व वडगाव येथील दोन तरुणांनी साध्य केला आहे. (Traditional farming) पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी कॉस्मेटिक प्रसाधनेसाठी लागणाऱ्या सुगंधी जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला. या अनोख्या प्रयोगाला त्यांनी आधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीची जोड दिली. त्यामुळे केवळ 5 एकरातून लाखोंचे उत्पन्न मिळवून त्यांनी हा अनोखा उपक्रम यशस्वी करुन दाखवला आहे. तालुक्यात सुगंधी शेतीचा हा पहिलाच प्रयोग असून आता याचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे.
परस्थिती बदलण्यासाठी घेतली ‘रीस्क’
शेती व्यवसयातून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जगणेही मुश्किल होते असे म्हणणाऱ्यांना येवला तालुक्यातील अनिल धनगे व त्याचा मित्र किरण पवार यांनी दाखवून दिले आहे की, शेतीमधून लाखोंचे उत्पन्न मिळवता येते ते. यासाठी आवश्यक आहे तो बदल. पारंपरिक शेतीवर केवळ उदरनिर्वाह होऊ शकतो पण योग्य नियोजन आणि विकेल तेच पिकेल हे धोरण ठरवून या दोघांनी 5 एकरामध्ये सुगंधित जिरेनियम रोपांची लागवड केली होती. पाच एकरामध्ये 50 हजार रोपांची लागवड करुन या दोघा मित्रांनी 4 लाख रुपये खर्च केला होता. उत्पन्न वाढीसाठी त्यांनी हा प्रयोग केला अन् यशस्वीही झाला.
सुगंधी शेतीला अत्याधुनिकतेची जोड
शेतीमालापेक्षा बाजारपेठेत कशाला मागणी आहे याचा अभ्यास अनिल व किरण यांनी केला होता. त्यानंतरच त्यांनी जिरेनियम शेतीचा मार्ग निवडला. 50 हजार रोपांची ती देखील गादी वाफ्यावर त्यांनी लागवड केली. यासाठी 5 एकराचे क्षेत्र होते. सुगंधी शेतीला लागणारे तापमान नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण शेतात ठिबक सिंचनाचा वापर केला असून पाच एकर करिता त्यांना साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च आला असून जवळपास त्यांना 25 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
कमी क्षेत्रात अधिकचे उत्पन्न
शेत जमिन क्षेत्र अधिकचे असून उपयोग नाहीतर आहे त्या क्षेत्राचा योग्य वापर करुन उत्पादन कसे वाढवता येईल हेच महत्वाचे आहे. त्यामुळेच या दोन मित्रांनी शेती क्षेत्राचा विचार न करता घ्यावयाचे उत्पादन आणि त्यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली यावरच त्यांनी अधिकचा खर्च केला. वर्षभरात 4 लाखाचा खर्च झाला असला तरी त्यांना आता या सुगंधी शेतीतून 25 लाखाच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेती हा केवळ करण्याचा विषय राहिला नसून नियोजनही तेवढेच महत्वाचे आहे.