Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : मुलाचे संशोधन अन् वडिलांचे परिश्रम आले कामी, नांदेडच्या प्रयोगशील शेतकऱ्याला उद्यान पंडित पुरस्कार

हळदीच्या उत्पादनापासून विविध शेती प्रयोगाला सुरवात केलेल्या धोंडिराम सुपारे यांनी पुन्हा माघारी वळून पाहिलेच नाही. त्यांना भाजीपाला, लिंबाची बाग असे एक ना अनेक प्रयोग केले. शिवाय शेती क्षेत्रावरच रोपवाटिका उभारली आणि या दरम्यानच्या काळात त्यांनी जय किसान शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जाळे उभारुन त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्सुत्य उपक्रम सुपारे यांनी सुरु केला.

Success Story : मुलाचे संशोधन अन् वडिलांचे परिश्रम आले कामी, नांदेडच्या प्रयोगशील शेतकऱ्याला उद्यान पंडित पुरस्कार
नायगांव तालुक्यातील टाकळगाव येथील धोंडीराम सुपारे उद्यान पंडित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 1:28 PM

नांदेड : शेती व्यवसायात करण्यासारखे खूप काही आहे पण परिश्रमाला अत्याधुनिक पध्दतीची जोड मिळणे गरजेचे आहे. अन्यथा आयुष्यभर मेहनत करुनही पाहिजे तसा बदल या क्षेत्रात होत नाही. पण (Nanded) नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या परिश्रमाला त्यांच्या मुलाच्याच (Research) संशोधनामुळे नवी ओळख मिळाली आहे. नायगांव तालुक्यातील टाकळगाव येथील धोंडीराम सुपारे यांनी आतापर्यंत शेतीव्यवसायात (New Experiments) नवनवीन प्रयोग राबवल्याने त्यांना मानाचा समजला जाणारा उद्यान पंडित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.आणि याचे निमत्त त्यांचा मुलगा…सुपारे. मुलाने हळद शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकर बनवला आणि विभागीय स्तरावरच नव्हे तर त्याची राज्य स्तरावर देखील दखल घेण्यात आली. जिल्ह्यासह इतर भागातून शेतकरी हे या कुकवर हळद शिजवण्यासाठी येत असत. शिवाय याच वर्षी धोंडीराम सुपारे यांना हळद उत्पादनातून 9 लाखाचे उत्पादन झाले आणि येथूनच सुरवात झाली शेती व्यवसयातील नवनवीन प्रयोगाला. त्यांचे शेती व्यवसयातील योगदान आणि इतर शेतकऱ्यांना मिळालेली प्रेरणा यामुळे त्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रोपवाटिका अन् शेतकरी गट

हळदीच्या उत्पादनापासून विविध शेती प्रयोगाला सुरवात केलेल्या धोंडिराम सुपारे यांनी पुन्हा माघारी वळून पाहिलेच नाही. त्यांना भाजीपाला, लिंबाची बाग असे एक ना अनेक प्रयोग केले. शिवाय शेती क्षेत्रावरच रोपवाटिका उभारली आणि या दरम्यानच्या काळात त्यांनी जय किसान शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जाळे उभारुन त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्सुत्य उपक्रम सुपारे यांनी सुरु केला. त्यामुळे शेती व्यवसायतच नाही शेतकऱ्यांच्या जीवनमानात देखील बदल झाला आहे. त्यांच्य़ा या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

उच्चशिक्षित मुलाचा असा मिळाला आधार

धोंडिराम सुपारे यांचा मुलगा अभिजीत हा उच्चशिक्षण घेत असतानाच त्याने हळद शिजवण्यासाठी उपयोगी पडेल असा कुकर बनविला होता. जिल्हास्तरावरच नाही तर त्याच्या या अनोख्या संशोधनाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली होती. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हळदीचे अधिक उत्पादन घेतले जाते. या भागातील अनेक शेतकऱ्यांना या कुकरचा उपयोग झाला आणि त्याच वर्षी धोंडिराम यांना हळदीतून 9 लाखाचे उत्पन्न झाले. तेव्हापासूनच त्यांनी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवण्याचे ठरविले होते.

हे सुद्धा वाचा

शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग

केवळ एकाच उत्पादनावर भर नाही तर सुपारे यांनी 2010 पासून शेती व्यवसयात वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यामध्ये कांदा लागवड, गाजर लागवड, वांगी लागवड यांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी लिंबाची बाग जोपासली होती. 278 च लिंबाची झाडे पण विक्रमी उत्पादन याची दखल कृषी विभागाने घेतली व कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच सुपारे यांनी उद्यान पंडित हा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला होता. शेती व्यवसयातील प्रयोग आणि इतर शेतकऱ्यांना झालेला त्याचा फायदा हे योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.