Yawatmal : ‘गोमाते’च्या स्वागताचा अनोखा सोहळा, उपसरपंचासह ग्रामस्थ थिरकले ‘डीजे’ च्या तालावर

पुसद तालुक्यातील कारला येथील सुभाष धाड हे गायींचे संगोपन तर करतात पण नवीन गाय खरेदी केल्यानंतर जुन्या गायीची ते विक्री करीत नाहीत तर नातेवाईक व मित्र परिवाराला दान अर्थात आनंद देतात. शिवाय दान केलेल्या गाईची विक्री करायची नाही असे ते अभिवचनही घेतात.

Yawatmal : 'गोमाते'च्या स्वागताचा अनोखा सोहळा,  उपसरपंचासह ग्रामस्थ थिरकले 'डीजे' च्या तालावर
वडसद येथील उपसरपंच विजय काळे यांना गाय दान करण्यात आली. या गायीचे त्यांनी जंगी स्वागत केले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 10:24 AM

यवतमाळ : ढोल-ताशी, डीजेवर तरुणाई थिरकली म्हणजे समजायचे की महापुरुषांची जयंती किंवा भाईचा बडे. पण जिल्ह्यातील (Yawatmal) वडसद येथे डीजेचा आवाज घुमला तो वेगळ्याच कारणाने. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण वडसद येथील उपसरपंच यांनी (Cow) गोमातेचे स्वागत अशा धडाक्यात केले आहे की अख्या पंचक्रोशीत या अनोख्या आगमनाची चर्चा सुरु आहे. दान मिळालेल्या (Cow Welcome) गोमातेचे स्वागत फटाके फोडून व डिजे लावून करण्यात आले आहे. गावच्या उपसरपंचांनी ही गाय खरेदी केली नव्हती तर दान म्हणजेच आनंदी म्हणून मिळाली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीचे महत्व

भारतीय संस्कृतीत आईनंतर मातेचा दर्जा हा गाईला दिला जातो त्यामुळे तीला गोमाता असे म्हटले आहे.गाईपासुन मिळणारे दूध म्हणजे जणूकाही आईच्या दूधा समान असल्याने बालकांना ते फार आवडते.गाईचे मूत्र व शेण यामध्ये सुद्धा औषधी तत्वे असल्याने गाईचे महत्व अनन्यसाधारण आहे परंतु सध्याच्या काळात गाय पाळणे कठीण होत असल्याने बहुतांश शेतकर्‍यांकडे पशुधन नाही.परंतु पुसद तालुक्यातील कारला जुना येथील गोप्रेमी असलेले सुभाष धाड हे गाईंचा सांभाळ करण्याबरोबरच नवीन गाय खरेदी केल्यानंतर आधी घेतलेल्या गाईला नातेवाईक व मित्रमंडळीला दान अर्थात आनंद देऊन त्या गाईचे संगोपन करुन न विकण्याचे अभिवचन घेतात.

असे हे गोप्रमी

पुसद तालुक्यातील कारला येथील सुभाष धाड हे गायींचे संगोपन तर करतात पण नवीन गाय खरेदी केल्यानंतर जुन्या गायीची ते विक्री करीत नाहीत तर नातेवाईक व मित्र परिवाराला दान अर्थात आनंद देतात. शिवाय दान केलेल्या गाईची विक्री करायची नाही असे ते अभिवचनही घेतात. आतापर्यंत त्यांनी आठ जणांना गाईचे दान केले असून महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून वडसद येथील उपसरपंच विजय काळे यांना गाय आनंद देण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी गायीचे दान केले आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रामस्थ थिरकले डीजे च्या तालावर

वडसद येथील उपसरपंच विजय काळे यांना गाय आनंद देण्यात आली होती. जो अंदाज गोप्रेमी सुभाष धाड आहे त्यासाठी खरा उतरण्याच्या अनुशंगाने काळे यांनीही गायीचे स्वागत दणक्यात केले होते. कारला येथून गाईला झूल व हार घालून सजवत वडसद येथे आनताच विजय काळे यांनी गाईचे डिजेच्या तालावर व फटाके फोडून वाजतगाजत स्वागत केले व गाईची पुजा सपत्निक करुन स्विकार केला.यावेळी माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे, काळे परिवारातील सदस्यांसह गावकर्‍यांनी डिजेच्या तालावर ठेका धरुन आनंद व्दिगुणीत केला.आनंदी गाईचे घरोघरी आरती करुन पूजन करण्यात आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.