शेतकरी दुहेरी संकटात, गव्हाला मार्केटमध्ये दर मिळेना, भाजीपाल्याचे दर वाढले
धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दर दुपटीने वाढले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.
धुळे : धुळे (Dhule) कृषी उत्पन्न बाजार समिती गव्हाची आवक वाढली आहे. दररोज 22 हजार क्विंटल गव्हाची आवक बाजारात होत आहे, असं असलं तरी मात्र गव्हाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतातला गहू काढण्यास सुरुवात केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) आणला चांगल्या प्रतीचा गहू हा 2300 रुपये क्विंटल पर्यंत विकला जात असल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडत नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये (Rubi seoson) सर्वाधिक लागवड क्षेत्र हे गव्हाचे असते. जवळपास 50 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची लागवड यावर्षी झाले आहे.
मात्र आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गावाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एकीकडे गव्हाचे झालेल्या नुकसान आणि दुसरीकडे गावाला भेटणारा कमी भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती आहे. गहू घरात साठवून ठेवता येणार नाही आणि विकला तर तो परवडत नाही. अशी दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला आहे. शासनाने हस्तक्षेप करून किमान 2800 ते 3000 रुपये प्रति क्विंटरपर्यंत गहू विक्री झाला पाहिजे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
धुळे जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे दर दुपटीने वाढले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. भाजीपाल्याच्या कमी अवकमुळे दर हे तब्बल दुप्पट वाढले आहेत. सरासरी 40 रुपये किलो प्रमाणे मिळणारा भाजीपाला आता 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या भाजीपालाच्या दरामुळे मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांची झळ बसत आहे.