Unseasonal Rain : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले, फळबागांचं नुकसान, शेतकरी चिंतेत
Unseasonal Rain in Maharashtra : राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं आंब्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील (kandhar) बारुळ इथल्या प्रकाश वाखरडे यांनी खडकाळ जमिनीवर फळबाग फुलवली आहे. मात्र सध्या सातत्याने सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने यावर्षी या शेतकऱ्यांच्या बागेचे अतोनात नुकसान झाल आहे. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी शेतकऱ्यांची (Farmer) ही बाग पंचक्रोशीत ओळखली जाईल असं वाटलं होतं. पण यंदा वादळी वाऱ्याने बागेत आंब्यासह चिकूचा सडा पडला आहे. नांदेडमध्ये (Nanded) अश्याच प्रकारे फळबाग उत्पादकांचे नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
खरीप हंगामात नगदी पीक म्हणून मके मक्याची पेरणी केली जाते. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही ऋतूंमध्ये मक्याची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जात असते, तर दर हंगामाला मक्याची पेरणीचे क्षेत्र वाढत आहे. मका पीक कमी दिवसांत भरघोस उत्पादन देणारे आणि बाजारात मिळणारा चांगला दर यामुळे तीनही हंगामात मका शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात कापसापाठोपाठ सर्वाधिक क्षेत्रात मका पिकाची प्रामुख्याने लागवड लागवड जात आहे. मका पिकावर रोगराई देखील कमी प्रमाणावर असते, तर भाव देखील चांगला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. जिल्ह्यातील आठ हजार ८३६ शेतकऱ्यांना आठ कोटी १५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ही मदत देण्यासाठी पूर्वीच्या शासकीय पद्धतीने न देता जिल्हास्तरावरुन थेट डीबीटी पद्धतीने रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत निरला असल्याने खरीप हंगामाची पेरणी देखील वेळेवर होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दोन टप्प्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केलं होतं त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या विचार करून वेळेवर मदत दिली जात आहे. मात्र काही मोजके शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून ती देखील लवकरच मिळणार असल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यात रात्रभर अवकाळी पावसाने हजेरी लावलीय, रात्रभर पडलेल्या पावसामुळे अर्धापुर तालुक्यातील नदी नाले आता सकाळी तुडुंब भरून वाहतायत. काही ओढ्याना रात्री पूर देखील आला होता. तसेच अर्धापुर शहर जलमय झाले असून जागोजागी तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेय. गेल्या पंचवीस वर्षात इतक्या मोठ्या तीव्रतेचा अवकाळी पाऊस कधी झाला न्हवता, त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात पुरसदृश्य स्थिती पहायला मिळतेय. या अवकाळी मुळे अर्धापुर तालुक्यातील केळींच्या बागांचे मोठे नुकसान झालेय.