अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले, कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले
कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगा हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टी वरती सुद्धा ढगाळ हवामान आहे.
महाराष्ट्र : कोकणातील हापूस (Alphanso Mango) महाग अन् आता तोही कमी प्रमाणात आला आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा मद्रास, कर्नाटकातील आंब्यावरच अवलंबून राहावं लागत आहे . त्याचेही दर यावर्षी १०० ते १५० रुपये प्रती डझन वाढले आहेत. दरम्यान, वादळी वारे, गारपीट अन् ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आंबट कैरीची सुद्धा आवक कमी झाली असून सध्या बाजारात कैरी 40 ते ५० रूपाये किलोने विक्री होत आहे. वादळी वाऱ्याने आणि गारपीटने (Unseasonal rain) झाडावरील कच्चे आंबे झडल्याने यावर्षी आवक सुरूच झाली नाही. सुरुवातीला आंब्याच्या झाडाला मोहोर आला अन् ढगाळ वातावरणामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे आंबे बाजारात येण्यास उशीर होत आहे. त्यापूर्वीच कलमी आंबे बाजारात दाखल होत असून कोकणातही (kokan mango) हापूस चे उत्पादन कमी झाले आहे.
कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगा हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टी वरती सुद्धा ढगाळ हवामान आहे. सध्या दुपारपर्यंत आकाशात काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. सध्या मळभ असल्याने हवेतील आद्रता देखील वाढली आहे. पावसाची शक्यता वर्तवल्याने अंबा बागायतदार मात्र हवालदिल झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील तरी आंबा मिळावा यासाठी आंबा बागायतदारांची धडपड पाहायला मिळते.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जात असते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांदा विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आता बाजार समितीने निर्णय घेतला आहे. कांदा विक्रीसाठी नवीन बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फक्त कांद्याच्या लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य मार्केट नसल्यामुळे अनेक शेतकरी बाहेरगावी जाऊन कांदा विक्री करत होते. त्यामुळे त्यांना परवडत नव्हतं, मात्र आता नंदुरबार जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याने दोन पैसे शेतकऱ्यांचे वाचणार आहेत.