Mango fruit: फळांचा राजा पुन्हा अडचणीत, आता थेट उत्पादनावर परिणाम
मोहर लागण्यापासून ते आता फळधारणा होईपर्यंत आंबा फळबागांवर अवकाळी आणि बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी थंडीत वाढ झाल्याने चांगला मोहर बहरला होता पण सध्याचा पाऊस आणि अधिकचा वाढलेला गारवा यामुळे पुन्हा मोहर लागडत आहे तर फळधारणा झालेल्या कैऱ्यांवर देखील या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे.
रत्नागिरी : मोहर लागण्यापासून ते आता फळधारणा होईपर्यंत (mango fruit) आंबा फळबागांवर (Untimely Rain) अवकाळी आणि बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. मध्यंतरी थंडीत वाढ झाल्याने चांगला मोहर बहरला होता पण सध्याचा पाऊस आणि अधिकचा वाढलेला गारवा यामुळे पुन्हा मोहर लागडत आहे तर फळधारणा झालेल्या कैऱ्यांवर देखील या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या अवकाळीनंतर आता कुठे फळबागा सावरु लागल्या होत्या. मात्र, आंबा पिकाचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका (Hapus Mango) हापूस आंब्याला बसलाय. याचा परिणाम आता थेट उत्पादनावर होणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा 40 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज आता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कोकणच्या अर्थव्यवस्थेवरही होतोय परिणाम
कोकणातील आंबा फळाचे वेगळेपण आहे. फळांचा राजा असलेल्या हापूसला तर मोठ्या प्रमाणात मागणी असते शिवाय हंगामाच्या सुरवातीला मिळणाऱ्या विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती तर होत आहेच शिवाय कोकणातील अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम कायम राहिलेला आहे. आंब्यामुळे कोकणात अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र गेल्या काही वर्षापासून ही अर्थव्यवस्था कोलमडू लागलीय. यावर्षी देखील आंबा पिकावर वातावरणाचा परिणाम झालाय. अगोदरच लांबणीवर गेलेलं आंबा पिक आणखीन लांबणीवर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळं बागायतदार हवालदिल झाला आहेत. अडचणीत असलेल्या फळ बागायतदारांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.
अवकाळीमुळे असे झाले नुकसान
डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळतीचा धोका होता. त्यामुळे हंगाम लांबणीवरही पडला होता. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये योग्य ती उपाययोजना करुन शेतकऱ्यांनी झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला वाढत्या थंडीमुळे आधार मिळाला होता. मध्यंतरी थंडी वाढल्याने मोहरही बहरला पण पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले आहे. पाऊस आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर वाऱ्यामुळे फळगळतीचा धोका कायम आहे. शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करुन फळांच्या राजाला जोपासले पण अवकाळीने हिरावलेच अशीच सध्याची अवस्था झाली आहे. पुन्नरमोहर टाळण्यासाठी पुन्हा फवारणीचा खर्च करावा लागणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
पहिल्या हंगामात हापूसचे डौलानं आगमन पण संकट कायम
गत महिन्यात मुंबई बाजार समितीमध्ये फळांचा राजा असलेल्या हापूसचे मोठ्यान डौलानं आगमन झाले होते. व्यापाऱ्यांनीही याचे स्वागत करुन नैसर्गिक संकट टळण्यासाठी प्रार्थना केली होती. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या हंगामातील फळ बागांनाच असताना पुन्हा अवकाळीने आपले रंग दाखवले आहेत. त्यामुळे आगमन तर झाले होते पण शेवट कसा होणार याबाबत चिंता कायम आहे.
संबंधित बातम्या :
Milk Business: आता विद्यापीठातूनच दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे धडे, कृषी विद्यापीठाचा पुढाकार
Silk Farming : शेतीचे बदलते स्वरुप, रेशीमचे उत्पादन अन् कोष खरेदीही, कोट्यावधींची उलाढाल