AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

उन्हाळ्यात का होईना अवकाळी पाठ सोडेल अशी आशा होती पण महिन्याकाठी पाऊस हा ठरलेलाच आहे. आता कुठे रब्बी हंगामातील पीक काढणीची लगबग सुरु झाली आहे. असे असतानाच पुन्हा राज्यभर अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणार आहे पण काढणी झालेल्या शेतीमालही काळवंडण्याचा धोका आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather Report : उन्हाळ्यातही अवकाळीचे संकट कायम, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 23, 2022 | 10:54 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यात का होईना (Unseasonal Rain) अवकाळी पाठ सोडेल अशी आशा होती पण महिन्याकाठी पाऊस हा ठरलेलाच आहे. आता कुठे (Rabi Season) रब्बी हंगामातील पीक काढणीची लगबग सुरु झाली आहे. असे असतानाच पुन्हा राज्यभर अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा (Meteorological Department) हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणार आहे पण काढणी झालेल्या शेतीमालही काळवंडण्याचा धोका आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंब्याची गळ होण्याचा धोका आहे. किमान तीन ते चार दिवस हे पावसाचेच असणार आहेत. एवढेच नाही तर मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महिन्याभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा फळपिकावर झाला असून पुन्हा दक्षिण कोकणातच अधिकचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी बरसणार

गेल्या चार दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही. त्यामुळे थेट फळबागा आणि पिकांवर परिणाम झालेला नव्हता. पण आता 23 ते 26 मार्च या कालावधीत अवकाळीची अवकृपा राहणार आहे. आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण कोकणात आंबा गळतीचा सर्वाधिक धोका झाला आहे. मध्यंतरी अवकाळी त्यानंतर वाढत्या उन्हाच्या झळा आणि आता पुन्हा अवकाळाचे सावट त्यामुळे शेवटच्या हंगामातील आंबा शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे.

पावसाचे प्रमाण कमी पण धोका अधिक

राज्यातील दक्षिण कोकण म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि विदर्भात अवकाळीची अवकृपा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा कोकणातील आंबा फळपिकावरच या अवकाळीचा परिणाम होणार आहे. वर्षभर निसर्गाच्या लहरीपणामुळे फळपिकांचे नुकसान झाले आहे. आता काढणी दरम्यानही हे नुकसान अटळ असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मराठवाड्यातही ढगाळ वातावरण

मराठवाड्यात पाऊस नाही पण ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे गरजेचे आहे. जे खरिपात झाले त्याची पुनरावृत्ती होऊ न देता उत्पादनाची सुरक्षा ही महत्वाची आहे. शिवाय या वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळवंडण्याचा धोका असतो. त्यामुळे काढणी, मोडणी आणि लागलीच मळणी कामे उरकून पीक पदरात पाडून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

State Government: खरिपापूर्वीच बदलणार मदतीचे निकष, नुकसानभरपाईत नेमक्या त्रुटी काय?

Rabi Season : लगबग सुगीची, शेतकऱ्यांचा कडधान्यावर भर, यंदा वाढणार ज्वारीचे दर..!

Chemical Fertilizer : रासायनिक खताने उत्पादनात वाढ, शेतजमिनीचे काय? कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.