Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली
अवकाळी पावसाने आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या मुळावर उठलेले आहे. यावळी तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. पण सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री अवकाळीने हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्ग : अवकाळी पावसाने (Mango Fruit Crop) आंबा फळपिक हे शेतकऱ्यांच्या पदरी पडूच द्यायचे नाही असाच निर्धार केल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरपासून हंगामाला सुरवात झाली आणि तेव्हापासूनच अवकाळं गाभणं आबा उत्पादकांच्या मुळावर उठलेले आहे. यावळी तर हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. 5 एप्रिलपासून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. पण (Konkan) सिंधुदुर्गात मात्र, 4 एप्रिलाच रात्री (Unseasonal Rain) अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे काढणीला आलेला आणि कैरी अवस्थेतील आंब्याचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. मध्यंतरीच्या निरभ्र वातावरणामुळे अवकाळीचे संकट दूर झाले असे वाटत असताना पुन्हा एकदा निसर्गाने लहरीपणा दाखवलेला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे आंबा या फळपिकाचे होणार आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
5 एप्रिलपासून राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, बुलडाणा, अकोला, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यामंध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोकण भागात 4 एप्रिल रोजी रात्रीच पावसाला सुरवात झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली आहे. एकीकडे ढगाळ वातावरण आणि पाऊस बरसत असतानाच मराठवाड्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ झाली आहे. तर उर्वरीत राज्यात सरासरीप्रमाणे तापमान आहे.
तीन दिवस धोक्याचेच
भर उन्हाळ्यातही पावसाची अनुभती काही भागात येत आहे. 5 एप्रिल रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट राहणार आहे.6 एप्रिल रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर 7 एप्रिल रोजीही याच भागांमध्ये अवकाळीचे संकट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आंब्याचे अंतिम टप्प्यातही नुकसानच
हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाचा परिणाम आंबा फळबागांवर झाला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण आता तोडणीला आलेल्या आंब्यालाही फटका बसत आहे. मध्यंतरी आंबा उत्पादक संघाने यंदा केवळ 25 टक्के फळपिक शेतकऱ्यांच्या हाती लागल्याचे सांगितले होते. आता हंगामाच्या शेवटच्या बहरावरच सर्वकाही अवलंबून होते. असे असताना पुन्हा अवकाळीचे संकट ओढावल्याने फळगळ आणि कैऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादकांना प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची.
Rainfall/thundershowers very likely over parts of Konkan and Madhya Maharashtra during next 4-5 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/RuRSxcxuhn
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 4, 2022
संबंधित बातम्या :
Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा
Hapus Mango : ‘शिवनेरी’ हापूसलाही भौगोलिक मानांकन..! जुन्नरच्या वैभवात पडणार भर