Vegetable Export : लंडन, जर्मनीसह इतर देशात भाजीपाल्याची निर्यात, पाच पट वाढले शेतकऱ्यांचे उत्पन्न

Vegetable Export : डॉ. रामकुमार राय मुहम्मदाबादजवळील जोगा मुसाहिबचे राहणारे आहेत. आधी डॉ. रामकुमार राय पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यात त्यांना नफा कमी मिळत होता.

Vegetable Export : लंडन, जर्मनीसह इतर देशात भाजीपाल्याची निर्यात, पाच पट वाढले शेतकऱ्यांचे उत्पन्न
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 3:54 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे शेतकरी धान, गहू, ऊस आणि बटाट्याची शेती करतात. याशिवाय काही शेतकरी फळबाग लागवडही करतात. गाजीपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रीय पद्धतीने हिरव्या भाजीपाल्याची शेती करतात. युरोप आणि आफ्रिकेत भाजीपाल्याची निर्यात करतात. आता आपण अशा एका शेतकऱ्याबद्दल पाहणार आहोत ज्यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांचे नाव आहे डॉ. रामकुमार राय.

सात वर्षांपासून सेंद्रीय शेतीची लागवड

डॉ. रामकुमार राय मुहम्मदाबादजवळील जोगा मुसाहिबचे राहणारे आहेत. आधी डॉ. रामकुमार राय पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. त्यात त्यांना नफा कमी मिळत होता. गेल्या सात वर्षांपासून ते सेंद्रीय आणि आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची शेती करत आहेत. यामुळे डॉ. रामकुमार राय यांची मोठी कमाई होत आहे.

आफ्रिका खंडात फ्लाईटने भाजीपाला पाठवला जातो

डॉ. रामकुमार राय आपल्या शेतीत लवकी, शिमला मिर्ची, फुलगोबी, टमाटर, काकडी, लाल भेंडी, स्ट्राबेरी, पपई आणि हिरव्या मिर्चीची लागवड करतात. शेतात तयार होत असलेला भाजीपाला लंडन आणि सौदी अरब देशात पाठवला जातो. यामुळे त्यांना पाचपट अधिक आर्थिक लाभ होत आहे. ऑस्ट्रीया, जर्मनी, हंगेरी, ओमान, कतार या देशात गाजीपूरवरून निर्यात होत आहे. याशिवाय आफ्रिका खंडात भाजीपाला प्लाईटने पाठवला जातो.

४०० हेक्टरमध्ये सेंद्रीय आणि आधुनिक शेती

राजकुमार राय यांना निर्यात करण्यासाठी २०२०-२१ मध्ये परवाना मिळाला होता. कोरोना काळात भाजीपाला खराब होत होता. त्यामुळे त्यांनी निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी लायसन्ससाठी अप्लाय केला. एपीडाकडून त्यांना परवाना मिळाला. गाजीपूरच्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद पसरला आहे. जीवनमान उंचावले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.