Onion : कृषी विद्यापीठाचे शाश्वत कांदा बियाणे वापरा अन् उत्पादनाबाबतचा वांदा मिटवा, असा घ्या बियाणांचा लाभ..!

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठेही महत्वाची भूमिका निभावत आहेत. नाशिक, नगर भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून दरवर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणांची निर्मिती केली जाते. यंदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाणांची बियाणांची निर्मिती केली आहे.आतापर्यंत 4 टनाहून अधिकचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.

Onion : कृषी विद्यापीठाचे शाश्वत कांदा बियाणे वापरा अन् उत्पादनाबाबतचा वांदा मिटवा, असा घ्या बियाणांचा लाभ..!
कांदा
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 1:59 PM

अहमदनगर : सध्या घटत्या दरावरुन (Onion Rate) कांदा हा चर्चेत असला तरी कांद्याचे दर लहरी मानले जातात. त्यामुळे आगामी काळात (Onion Production) कांद्यातून उत्पादन मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना कायम असतो. त्यामुळे आता (Kharif Season) खरिपातील कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांनी शाश्वत बियाणांचा वापर केला तर उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आतापर्यंत 4 टन बियाणांची विक्री केली आहे तर आणखीन 10 टन 759 किलो बियाणे शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने बियाणांसाठी नोंदणी केली तर वेळत बियाणे मिळणार आहे.

असा विद्यापीठातील बियाणांचा लाभ

शेतकऱ्यांना बियाणांचा लाभ घेण्यासाठी https://www.phuleagromart.com या संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाईन रक्कम अदा करावी लागणार आहे. शिवाय नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विद्यापीठाकडून मोबाईलवर मॅसेज केला जाणार आहे. त्यामुळे नोंदणीधारक शेतकऱ्यांना बियाणे घेताना ऑनलाईन नोंदणी केलेला पुरावा, आधारकार्ड, सातबारा, बॅंकेत रक्कम जमा कल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे.

या वाणाचे बियाणे उपलब्ध

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी राज्यातील कृषी विद्यापीठेही महत्वाची भूमिका निभावत आहेत. नाशिक, नगर भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून दरवर्षी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणांची निर्मिती केली जाते. यंदा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाणांची बियाणांची निर्मिती केली आहे.आतापर्यंत 4 टनाहून अधिकचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे कांदा लागवडीकडे अद्यापही शेतकरी वळले नसले तरी या वाणाच्या बियाणांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपात कांद्याचे उत्पादन अधिक

सध्या कांद्याचे दर हे घसरलेले असले तरी कांदा क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर हे कायम असेच राहणार नाहीत आता पावसाळ्यामध्येच कांदा मार्केट बदलण्यास सुरवात झाली आहे. शिवाय खरीप हंगामातील वातावरण कांद्यासाठी पोषक मानले जाते. राज्यात सर्वाधिक कांदा लागवड ही नाशिक आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात होत आहे. राहुरी विद्यापीठात कांदा खरेदीसाठी इतर जिल्ह्यातूनही शेतकरी दाखल होत आहेत. पावसाचा जोर वाढला की यामध्ये वाढ होणार असल्याचा विश्वास विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील यांनी सांगितले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.