Vegetable : ‘टोमॅटो’चा तोरा कायम, नांदेडात शंभरीपार, वाढत्या दरावर परिणाम कशाचा?
शेतीमालाची आवक घटली की दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. हेच सूत्र आता भाजीपाल्याच्या बाबतीत होताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडेच दुर्लक्ष केले.
नांदेड : सध्या मुख्य (Agricultural goods) शेतीमालाच्या दरात चढ-उतार होत असले तरी भाजीपाल्याने मात्र, शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून (Tomato Rate) टोमॅटोचा दरवाढीने लालेलाल झाले असून इतर (Vegetable) भाज्यांनाही सरासरीप्रमाणे दर मिळत आहेत. त्यामुळे मुख्य पिकातून नाहीपण हंगामी भाजीपाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. आतापर्यंत राज्यातील मुख्य बाजारपेठेत टोमॅटो हे 100 रुपये किलोने विकले जात होते पण आता हेच दर स्थानिक पातळीवरही मिळत आहे. त्यामुळे वाढत्या दराची झळ आता सर्वसामान्यांनाही सहन करावी लागत आहे. खरिपाच्या तोंडावर भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने ही स्थिती ओढावली आहे.
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
शेतीमालाची आवक घटली की दर वाढणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. हेच सूत्र आता भाजीपाल्याच्या बाबतीत होताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडेच दुर्लक्ष केले. त्यामुळे उत्पादन घट झाल्याने टोमॅटो शंभरीपार गेले आहे. यापूर्वी मेट्रो शहरांमध्ये टोमॅटो 100 पेक्षा अधिकच्या दरावर गेले होते पण आता स्थानिक पातळीवरही टोमॅटो दरात वाढ झाली आहे. टोमॅटो बरोबर इतर भाजीपाल्याचेही दर वाढले आहेत.
खरिपामुळे घटले उत्पादन
सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे. खरिपासाठी अधिकचे क्षेत्र मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे पाठ फिरवून खऱिपासाठी क्षेत्र मोकळे कसे राहिल यावरच लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे भाजीपाल्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. शिवाय टोमॅटोमुळे अधिकचे नुकासान तर होतेच पण क्षेत्रही पुन्हा पडून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले नाही. त्यामुळे सध्या बाजारपेठेत मागणी प्रमाणे पुरवठा होत नाही. परिणामी दरात वाढ होत असून टोमॅटो बरोबरच शेवगा, मिरची, वांगी या भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे.
अजून महिनाभर दर कायम राहणार
भाजीपाल्याचे दर हे एका रात्रीतून कमी होतात अन्यथा विक्रम तरी करतात. आता पावसाला सुरवात होणार असून खरिपाच्या दरम्यान जरी भाजीपाल्याची लागवड केली तरी उत्पादन मिळण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मागणीच्या तुलनेत पुरवठा होणार नसल्याने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.आणखी महिनाभर भाजीपाल्याचे भाव हे चढेच असतील असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटो पेक्षा इतर भाजीपाल्यावरच भर दिला जात आहे.