296 पोते बियाणे बोगस बियाणे पोलिसांनी पकडले, पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल, आठ आरोपी ताब्यात
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बोगस बियाणे सापडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी आठ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा (wardha mhasala) येथे कपाशीच्या बोगस बियाण्याचा (bogus seeds ) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकत ही कारवाई केली. पोलिसांनी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमन्वये पंधरा आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुजरात (GUJRAT) येथून बियाणे आणून पॅकिंग करून विक्री करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी (Wardha police) बोगस बियाणांसोबत एक कोटी ५५ लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.
वर्धा येथील म्हसाळा परिसरात एका घरामध्ये कपाशीच्या बोगस बियाण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेऊन छापा टाकला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियाणे, विविध कंपनीचे बनावट पॅकेट, पॅकिंग मशीन, वजन काटा आदी साहित्य आढळून आले. गुजरात येथून आणलेले बियाणं पॅकिंग करून विदर्भात विकले जात आहेत. एका ट्रकमध्ये असलेले बियाणे सुद्धा मिळाले. पोलीस, महसूल, आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई केली आहे. एक कोटी 55 लाख 83 हजार 970 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. कापसाचे बोगस बियाणे गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील गावातून आणले असल्याची माहिती मिळाली आहे.
कारवाई केलेला कारखान्यातून विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ यासह इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्र मार्फत बियाण्याची विक्री केली आहे. यापूर्वी यांनी 14 टन बोगस बियाण्याची विक्री केली आहे. कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून वेगवेगळ्या कलमन्वये १५ आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. त्यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.