Washim : शेतकऱ्याचं तीळ पेरण्याचं देशी जुगाड व्हायरल, बियाणांची बचत होत असल्यामुळे पाहणीसाठी लोकांची गर्दी
सोशल मीडियावर रोज व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये शेतीचे सुद्धा अनेक चांगले व्हिडीओ असतात. काही शेतकरी इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून शेतीच्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात.
वाशिम : तीळ (benne) हे तेलवर्गीय असल्याने तिळाला बाजारात (market) नेहमी मोठी मागणी असते. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी (Washim Farmer) उन्हाळी तिळाच्या पेरणी करीत आहे. मात्र तीळ हे बारीक पीक असल्याने पेरण्याचं काम मोठं जिकरीची असतं. मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी टाकाऊ वस्तूपासून उन्हाळी तीळ पेरण्याचे केले देशी जुगाड तयार केलं आहे. त्यामुळं तिळाची पेरणी एक सारखी होत असून बियाणांची सुद्धा बचत होत आहे. हा देशी जुगाड पाहायला अनेक शेतकरी तिथं येत आहेत. त्याचबरोबर या देशी जुगाडाचा फायदा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे.
तीळाच्या पेरणीचा सध्या जोर वाढला असून लोकांना अधिक मेहनत करावी लागत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अजय ढोक यांनी काही टाकाऊ वस्तू एकत्र करुन पेरणीचा जुगाड केला आहे. त्यामुळे त्यांची चर्चा परिसरात आहे.
सोशल मीडियावर रोज व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये शेतीचे सुद्धा अनेक चांगले व्हिडीओ असतात. काही शेतकरी इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून शेतीच्या काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. सोशल मीडियावर शेतीच्या फायद्याचे अनेक व्हिडीओ आहेत.