व्हॉटसअ‌ॅपवर तुम्ही काय करता? ‘या’ शेतकऱ्यानं व्हॉटसअ‌ॅपवरुन विकलाय लाखोंचा भाजीपाला

भाजीपाला विक्रीच्या जोरावर सदाशिव राऊत यांच्या कुटुंबातील 11 जणांचा उदरनिर्वाह चालतो. Washim Farmer Sadashiv Raut

व्हॉटसअ‌ॅपवर तुम्ही काय करता? 'या' शेतकऱ्यानं व्हॉटसअ‌ॅपवरुन विकलाय लाखोंचा भाजीपाला
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 4:45 PM

वाशिम: वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारे दर यामध्ये मोठी तफावत असल्याने विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली येथील सदाशिव राऊत या शेतकऱ्यानं दीड एकर क्षेत्रावर सेंद्रीय पद्धतीनं देशी भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. त्यासोबत विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळं अवघ्या दीड एकर शेतात 40 हजार लागवड खर्चात वर्षाकाठी साडेचार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळवत आहेत. (Washim Farmer Sadashiv Raut Sold vegetables on whatsapp)

भाजीपाल्यावर अकरा जणांचं कुटुंब

वाशिम जिल्ह्यातील बिटोडा तेली येथील सदाशिव राऊत यांच्याकडे दीड एकर शेती आहे. 2014 पासून ते सेंद्रीय पद्धतीनं भाजीपाला लागवड करतात.यामध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना कुटुंब जगवणं कठीण झालं होतं. मात्र, त्यांनी सेंद्रीय शेतीचा मार्ग निवडला आणि भाजीपाला घेणं सुरु केले. तेव्हापासून 11 जणांचं कुटुंब चालवून वर्षाकाठी लाखों रुपायांचा नफा मिळवत आहेत.

भाजी विक्रीसाठी भन्नाट आयडिया

सेंद्रीय भाजीपाल्याला बाजारात चांगले दर मिळत नसल्याने त्यांनी विक्री करण्यासाठी वाशिम शहरातील डॉक्टर, वकील,अधिकारी यांचा एक व्हाट्सअ‌ॅप ग्रुप तयार करून त्यांना मागणीप्रमाणे घरपोच भाजीपाला देत आहेत. त्यामुळं त्यांना चांगला नफा मिळत असून, ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे.

सदाशिव राऊत यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड करत असताना  विदेशी भाजीपाला घेणे सुरू केले. यामध्ये लेटूस, रेडकॅबिज, आणि ब्रोकोली या तीन प्रकारच्या विदेशी भाज्या ते घेतात. राऊत यांनी विदेशी भाज्यांचा प्रयोग यशस्वी केला आहे. या भाज्यांना पुणे,मुंबईला तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र, वाशिममध्ये 120 रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. (Washim Farmer Sadashiv Raut Sold vegetables on whatsapp)

सेंद्रीय पद्धतीनं विदेशी भाजीपाला लागवड

सदाशिव राऊत यांनी सेंद्रिय देशी भाजीपाल्यासोबत विदेशी भाजीपाला पिकवण्याचा प्रयोग केला आहे. एरवी विदेशी भाजीपाला हा पॉलिहाऊस शिवाय पिकवता येत नाही हा समज आहे. मात्र,सदाशिव राऊत यांनी सेंद्रीय पध्दतीने उघड्या शेतात विदेशी भाजीपाला पिकवला आहे. राऊत यांच्याकडे दीड एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये ते आंतरपीक पद्धतीचा वापर करतात. सेंद्रीय पद्धतीनं शेती करतो, कुटुंबाचा खर्च हा भाजीपाल्यातून करतो. ग्राहकांकडूनही भाजीपाल्याला चांगला प्रतिसाद असल्याचं, स्वाती राऊत यांनी सांगितले.

दिवसेंदिवस वाढत असलेली रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा वापर त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, सदाशिव राऊत उत्पादन खर्च कमी करून भाजीपाला पिकवत असल्याने त्यांना तर फायदा होतोच शिवाय नागरिकांना विषमुक्त भाजीपाला मिळत आहे. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनीही यांच्या प्रमाणे सेंद्रीय शेती केल्यास त्यांना चांगला फायदा होईल. सदाशिव राऊत यांना शेतातील कामात त्यांची पत्नी स्वाती राऊत आणि भाऊ देविदास राऊत यांची मदत होते.

दशपर्णी अर्क, टॉनिक आणि कीटकनाशक घरच्या घरी सेंद्रीय पद्धतीनं तयार करतो, अशी माहिती देविदास राऊत या युवा शेतकऱ्यांनं सांगितले. घरच्या घरी बनवलेल्या औषधांची स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केली जातेय.

संबंधित बातम्या:

Photos | पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 11 एकरात 26 हजार स्ट्रॉबेरीची लागवड

हिंगोलीच्या शेतकऱ्याची कमाल; दुष्काळी पट्ट्यात पपईचे विक्रमी उत्पादन, कमावला लाखोंचा नफा

(Washim Farmer Sadashiv Raut Sold vegetables on whatsapp)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.