सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला
कपाशी नंतर नगदीचे पीक म्हणून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलीय. मागील आठवड्या पासून पाऊस न पडल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञां कडून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉ. भारत गीते यांनी केले आहे.
वाशिम: पश्चिम विदर्भात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीनच्या पिकावर मागील एक आठवड्यापासून पडलेल्या पावसाच्या खंडामुळे चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळी या सारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच कीड व्यवस्थापनासह सोयाबीन पिकाला आजच्या अवस्थेत आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्न द्रव्याचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आलंय. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या वाशिम संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. भारत गीते यांनी याबाबत सविस्रतर माहिती दिलीय.
कीड व्यवस्थापन करण्याचं आवाहन
कपाशी नंतर नगदीचे पीक म्हणून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचं पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलीय. मागील आठवड्या पासून पाऊस न पडल्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञां कडून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉ. भारत गीते यांनी केले आहे.
तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या
किडीच्या प्रादुर्भावा मुळे वेळीच उपाययोजना न केल्यास पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते.अशावेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शना नुसार सर्वत्र उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांचा वापर करून यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे डॉ. गीते यांनी यावेळी सांगितले.
फलधारणेच्या अवस्थेतील पिकांची काळजी घेणं आवश्यक
जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी झालेले सोयाबीनचे पीक आज फलधारणेच्या अवस्थेत असून या कालावधित पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणाचाही परिणाम या अवस्थेत पिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या सर्व कारणांमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी किडी सोबत सूक्ष्म अन्न द्रव्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉ. गीते यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा
वाशिम जिल्ह्यात यंदा सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी सावरत मशागत केल्याने सोयाबीन पिक चांगलं बहरले आहे.मात्र ऐन फुलं आणि शेंगा लागण्याच्या स्थितीत असताना गेल्या 15 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानं सोयाबीन पीक करपत आहे.त्यामुळं येत्या दोन तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट येणार आहे. जिल्ह्यात एकूण 4 लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास 3 लाख हेक्टरवर सोयाबीन च पीक घेतल्या जाते त्यामुळं पावसाने दगा दिला तर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात येणार आहे.
सोयाबीनचे दर घसरले
जिल्ह्यातील कृषी बाजारपेठत जवळपास 11 हजार रुपये प्रतिक्विंटल दरापर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर आता झपाट्याने घसरत आहेत. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात 2 हजारांची घसरण.नवीन सोयाबीनचा हंगाम ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये येणार तोपर्यंत हे दर किती कमी होतील, असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
इतर बातम्या:
10 लाख हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड, सरकारचा मेगा प्लॅन, शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार
Washim Punjabrao Deshmukh University Dr.Bharat Gite appeal farmers to prevent soybean from insects via insect management using pesticides