Summer Season: पाण्याचे व्यवस्थापन हेच उत्पादन वाढीचे सूत्र, पिकनिहाय कसे करावे पाण्याचे नियोजन?

उन्हाळी हंगामातील पीके ही पाण्यावरच अवलंबून असतात. रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातच लागते. त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात. मात्र, पाऊसच होऊन उपयोग नाही तर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादन घेण्यापूर्वीच आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Summer Season: पाण्याचे व्यवस्थापन हेच उत्पादन वाढीचे सूत्र, पिकनिहाय कसे करावे पाण्याचे नियोजन?
उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन केले तर उत्पादनात वाढ होणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 5:10 AM

लातूर :  (Summer Season) उन्हाळी हंगामातील पीके ही पाण्यावरच अवलंबून असतात. रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातच लागते. त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात. मात्र, पाऊसच होऊन उपयोग नाही तर उपलब्ध (Water Planning) पाण्याचे योग्य नियोजन होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पादन घेण्यापूर्वीच आपल्याकडे किती (Water Available) पाणी उपलब्ध आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पीकाला पाण्याची पाण्याची गरज किती? हे ठरवताना पहिल्यांदा आपण कोणत्या हंगामात पीक घेणार आहोत हे महत्वाचे आहे त्यानंतर पिकाचा प्रकार व जात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्था आणि पीक तयार होण्यास लागणारा एकूण कालावधी या सर्व बाबी महत्वाच्या आहेत.

पिकाच्या अवस्थेनुसार बदलते पाण्याची गरज

पेरणीपासून काढणीपर्यंत पिकांच्या पाण्याच्या गरजा ह्या बदलत राहतात. पाण्याची गरज ही एकसारखी कधीच नसते. पिकाच्या वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत म्हणजे उगवण, पिकवाढीची सुरवातीची अथवा प्राथमिक अवस्था, वाढीची अवस्था, फुलोरा काळ तसेच दाणे भरण्याची किंवा पिक पक्व होण्याची अवस्था भिन्नभिन्न काळातील पाण्याची गरजही देगवेगळया प्रमाणात असते. धान्य पिकांच्या बाबतीत पिकांच्या बाल्यावस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते, तर पीक पक्व होण्याच्या काळात पाण्याची गरज पुन्हा कमी होते.

उन्हाळी हंगामात ठराविक अंतराने पाणी देणे गरजेचे

उन्हाळी हंगामातील पिके ही अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्या अवस्थेनुसार पाणी दिल्यास दोन पाण्यातील अंतर हे जास्त राहते. त्याचा विरपरीत परिणाम हा उत्पादनावर होतो. फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकांस पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. मात्र, जी पिके संवेदनशील आहेत त्यांना ठराविक अंतरानेच पाणी देणे महत्वाचे ठरणार आहे. उन्हाळी हंगामात पिकानिहाय ठिबक सिंचन किंवा स्प्रिंक्लरचा वापर केला तर अधिकचे फायद्याचे ठरणार आहे.

उन्हाळी हंगामातील पिके व पाण्याचे नियोजन

भुईमूग : उन्हाळी भुईमूगास पाण्याची पाळी जमिनिच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांच्या अंतराने द्यावे लागते. तुषार पद्धतीने भुईमूग पिकांस 48 सेमी पाणी लागते व प्रवाही पद्धतीने 24 सेमी कमी पाणी लागते. प्रवाही पद्धतीने भुईमूग पिकांस प्रत्येक पाळीच्या वेळी 6 सें.मी. पाणी द्यावे लागणार आहे तर तसेच तुषार पद्धतीने भुईमूग पिकांस 4 सें.मी. पाणी द्यावे.

उन्हाळी कांदा: उन्हाळी कांद्याला 13 ते 14 पाणी द्यावे लागतात. उन्हाळी कांद्याची पाण्याची गरज 75- 80 सें.मी. एवढे आहे. पाण्याची पाळी जमिनिच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांचे अंतराने योग्य ठरते.

ऊस : उन्हाळ्यात ऊस पिकांस 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. खोडवा ऊसासाठीही हीच पध्दत शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. पिकांच्या पाण्याच्या व्यवस्थापनावरच उत्पादन अवलंबून असल्याचे कृषितज्ञ डॉ. गेठे राजेंद्र मोहन यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन पाठोपाठ खरिपातील ‘या’ शेतीमालाचे दर वाढले, हरभऱ्याची विक्रमी आवक

Special News : महावितरणचा ‘शॉक’: वीज जोडणीविनाच हजारोंचे वीजबिल, महिला दिनादिवशीच विधवेची क्रुरचेष्टा

Cotton : कापूस दरवाढीला ‘ब्रेक’, आता साठवणूक की विक्री..! शेतकऱ्यांनी नेमके करावे काय ?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...