Weather Alert | जळगावला अवकाळी पावसाचा फटका, 1391.20 हेक्टरवरील मका मातीमोल

जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे 4 हजार 534.30 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. Jalgaon Unseasonal rain crops loss

Weather Alert | जळगावला अवकाळी पावसाचा फटका, 1391.20 हेक्टरवरील मका मातीमोल
जळगाव मका पिकाचं नुकसान
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 11:46 AM

जळगाव :  जिल्ह्यात सोमवारी (22 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध तालुक्यातील 4 हजार 534.30 हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार 906 हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून 1391.20 हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे. ( Weather Alert Jalgaon Unseasonal rain  crop loss on four thousand five hundred hector area)

अवकाळीचा पुन्हा फटका

गेल्या महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मधून बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा काल संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान

या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून 1 हजार 906 हेक्‍टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात 1592.90 हेक्‍टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात 862.20 हेक्‍टर, बोदवड तालुक्यात89.40 हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात 46 हेक्‍टर, भडगाव तालुक्यात 37.80 हेक्टरवर असे एकूण चार हजार 534.30 हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून सहा तालुक्यात 1391.20 हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बीडमध्येही अकाळी पावसाची हजेरी

बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. गेवराई तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. केकत पांगरी येथील गोविंद खाडे यांच्या शेतातील रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने उभी असलेली पीके आडवी झाली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

बीडमध्ये कुक्कुटपालन करणाऱ्यांना फटका

मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने याचा फटका कुक्कुट पालन करणाऱ्या व्यावसायिकांना बसला आहे. गेवराईच्या राजापूर येथील शेख इमाम आणि राहुल बेडके यांचं कोंबड्यांचा शेड उध्वस्त झाले. तब्बल 140 गावरान कोंबड्या मृत पावल्या आहेत तर अनेक कोंबड्या जखमी झाले आहेत. गारपिटीने नुकसान झाल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

बीड, वडवणी आणि माजलगाव तालुक्यात पावसाचा जोर

बीड जिल्ह्यात पहाटेपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालीय. मेघ गर्जनेसह सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. पहाटे पासूनच रिमझिम सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यात आज सूर्यदर्शन झालेच नाही. बीड, वडवणी आणि माजलगाव तालुक्यात पावसाचा जोर मोठा आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert | येत्या 24 तासात पावसाची शक्यता, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब 

( Weather Alert Jalgaon Unseasonal rain crops loss on four thousand five hundred hector area)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.