Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon Maharashtra Update

Weather Alert | मान्सूनचं आगमन लांबणीवर, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 5:04 PM

पुणे: राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. राज्यावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होतंय, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली. मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार याविषयी देखील साबळे यांनी अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुून केरळमध्ये 3 जूनला दाखल होईल.(Weather Alert Retired IMD chief Ramchandra Sable predicted monsoon may be five days late to reach Maharashtra)

येत्या पाच दिवसात पाऊस कुठे पडणार?

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. आयएमडीचे माजी प्रमुख हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. केरळात मान्सून 3 जूनला तारखेला दाखल होईल मात्र राज्यातील परिस्थिती पाहता तो वेळेत न येता चार पाच दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे.

मान्सून केरळमध्ये कधी पोहोचणार?

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, सद्याची बदलेली परिस्थिती पाहता मान्सून 3 जूनला रोजी केरळात दाखल होईल.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दुपारी अकोल्यात विजांच्या कडकटा सह जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या:

Yaas Cyclone: महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार; आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

(Weather Alert Retired IMD chief Ramchandra Sable predicted monsoon may be five days late to reach Maharashtra)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.