Weather Report : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधारांनी शेतकऱ्यांचं नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कुठं हलक्या पावसाच्या सरी तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला.

Weather Report : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधारांनी शेतकऱ्यांचं नुकसान
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 3:00 AM

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. कुठं हलक्या पावसाच्या सरी तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला. त्यामुळे या ठिकाणी वीजेचे खांब कोसळून त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचेही प्रकार घडला. यात कोल्हापूर, सांगली, नाशिक, रत्नागिरी, परभणी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील याच अवकाळी पावसाचा हा आढावा (Weather report of Maharashtra on 11 April 2021 Kolhapur Sangli Nashik Ratnagiri Parbhani).

कोल्हापूर

कोल्हापूर शहरात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढवली. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं.

इचलकरंजी

इचलकरंजी शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी काही घरांमध्ये घुसले. गांधी विकास नगरमधील काही घरांमध्ये पाणी पारीख कॉलनी परिसरात गटारीचे पाणी घरामध्ये घुसल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. शहरातील विकली मार्केट, कुडचे मळा, शाहू पुतळा परिसरामध्ये पाणीच पाणी झालं. पावसाने संपूर्ण शहराची लाईट गेली. त्यामुळे शहरांमध्ये अंधार पसरला होता. वादळी पावसामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

इचलकरंजीमधील वडगाव वटार येथील दत्त मंदिरजवळ असणाऱ्या वडाच्या झाडावर वीज पडल्यामुळे झाडाला मोठी आग लागली. त्यामुळे घटनास्थळी अग्निशामक गाडी बोलावून आग विझवावी लागली. मात्र, वीजेमुळे लागलेली आग इतकी तीव्र होती की संपूर्ण झाडाला आगीने वेढले.

रत्नागिरी

चिपळूण तालुक्यात सायंकाळी वादळीवाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अनेकांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पोसरे गावाला बसला. या ठिकाणी पत्रकार शाहीर शाहिद खेरडकर यांच्या घरावर झाड कोसळले. लग्नसमारंभ असलेल्या ठिकाणी लग्नाचा मांडव कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावी आज संध्याकाळी जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या जोरदार वादळात अनेकांच्या घरांचं नुकसान झालं. लग्नासाठी सजलेले मंडप वादळाने उध्वस्त केले. त्यामुळे खेरटकर कुटुंब संकटात सापडले आहे.

सांगली

सांगली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यात विशेषतः जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने उन्हाने काहिली झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. हवेत गारवा निर्माण झाला, पण यामुळे शेडवरच्या बेदाण्याला आणि द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय.

सातारा

सटाणा तालुक्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेमळी, ब्राह्मणगावसह इतर काही गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीत लिलावासाठी आणलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

परभणी

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने ज्वारी, गहू, हरबरा आणि फळ पिकांना फटका बसलाय. पाथरी तालुक्यात रविवारी सकाळपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतशिवारात काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले. आंबा, चिकू, टरबूज, खरबूज या फळ पिकांचेही नुकसान झाले.

हेही वाचा :

Weather Alert | महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांसह फळबागा, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

महाराष्ट्राच्या ‘या’ भागांत गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होणार ; मध्य भारतातील वातावरण बदलाचा परिणाम जाणवणार

वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय ; महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याचशा भागात पाच दिवस पाऊस व गारपीट

व्हिडीओ पाहा :

Weather report of Maharashtra on 11 April 2021 Kolhapur Sangli Nashik Ratnagiri Parbhani

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.