Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : ढगाळ वातावरणाचा धसका, शेतीमालाचे आवक वाढली दराचे काय?

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाली नसली तरी वातावरणातील बदलाचा चांगलाच धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. काढणी, मळणी आणि लागलीच विक्री असेच धोरण शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे. शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी हा निर्णय घेत आहेत.

Latur Market : ढगाळ वातावरणाचा धसका, शेतीमालाचे आवक वाढली दराचे काय?
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 1:57 PM

लातूर : गेल्या दोन दिवसांपासून (Marathwada) मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाली नसली तरी वातावरणातील बदलाचा चांगलाच धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. काढणी, मळणी आणि लागलीच विक्री असेच धोरण शेतकऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळेच (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये शेतीमालाची आवक वाढली आहे. शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी हा निर्णय घेत आहेत. तर आठवड्याच्या शेवटच्या टप्यात (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. शेतकरी आता साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत. म्हणूनच 10 हजार पोत्यांवरील आवक थेट 25 हजार पोत्यांवर गेली आहे. तर शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 हजार 370 रुपये प्रति क्विंटलचा दर होता. दुसरीकडे रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारीची देखील आवक सुरु झाली आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सोयाबीनचे दर हे 7 हजार 300 वर स्थिरावले होते. त्यामुळे यानंतर काय होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली होती. आता आठवड्याच्या शेवटी सोयाबीन दरात घसरण होत होती मात्र, शुक्रवारी 70 रुपायांची वाढ झाली आहे. दरवाढी बरोबर सोयाबीनची आवकही वाढत आहे. सध्या सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांचा भर आता साठवणूक केलेल्या सोयाबीनवर आहे. असे असले तरी भविष्यातही सोयाबीनचे दर टिकून राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीनची विक्री कायम ठेवतो का पुन्हा साठवणूक करतो हे पहावे लागणार आहे.

हरभऱ्याची विक्रमी आवक, दर मात्र हमीभावापेक्षा कमीच

यंदा हरभऱ्याचा विक्रमी क्षेत्रावर पेरा झाला आहे. त्याचप्रमाणे आवकही सुरु झाल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये आहे. हंगामाच्या सुरवातीपासून हरभऱ्याला 4 हजार 500 ते 4 हजार 700 या दरम्यानचाच दर मिळालेला आहे. तर दुसरीकडे हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आलेला आहे. मात्र, शेतकरी हे खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री करीत आहेत. मुळात खरेदी केंद्रावरील नोंदणीकडेच शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. अधिकचा दर असतानाही केवळ किचकट प्रक्रियेमुळे शेतकरी फिरकत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी खुल्या बाजारात 4 हजार 600 दर असताना 45 हजार पोत्यांची आवक झाली होती.

शेतकऱ्यांना काय आहे सल्ला ?

यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला आहे. आताकुठे आवकला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांनी जर टप्याटप्याने विक्री केली तरच दर टिकून राहणार आहेत. शिवाय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल कमी असला तरी भविष्यात तो वाढणार आहे. येथील नियम-अटींमुळे शेतकरी दुर्लक्ष करीत असले तरी आवक मोठ्या प्रमाणात झाली खरेदी केंद्राशिवाय पर्याय उरणार नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे: अखेर शेतकरी अपघात विम्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

Nanded : अतिवृष्टीचा असा हा परिणाम, खरिपात नुकसान तर रब्बी हंगामात कायापालट

उत्तर महाराष्ट्र, कोकणनंतर आता नंबर कुणाचा? ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.