शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय

कोरोना काळात सर्वच घटकांवर परिणाम हा झालेला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐवढेच नाही तर शेतकरी संघर्ष संघटनेच्या कामामध्येही शिथिलता आली होती. आता धोका टळला नसला तरी सर्वकाही पुर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळेच संघटनाही आता सक्रीय होणार आहे. त्याच अनुशंगाने सोमवारी शेतकरी चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या निफाड तालुक्यातून या बैठक पार पडली.

शेतकरी संघर्ष संघटनेचे काय आहेत 9 ठराव ? कोरोना संकटानंतर पुन्हा संघटना सक्रीय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:45 PM

लासलगाव : कोरोना काळात सर्वच घटकांवर परिणाम हा झालेला होता. जनजीवन विस्कळीत झाले होते. ऐवढेच नाही तर शेतकरी संघर्ष संघटनेच्या कामामध्येही शिथिलता आली होती. आता धोका टळला नसला तरी सर्वकाही पुर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळेच संघटनाही आता सक्रीय होणार आहे. त्याच अनुशंगाने सोमवारी शेतकरी चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या निफाड तालुक्यातून या बैठक पार पडली. शेतकरी संघर्ष संघटनेची संस्थापक अध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी कायदा करावा या मागण्यांसह नऊ ठराव मंजूर करण्यात आले.

काय आहेत शेतकरी संघर्ष संघटनेचे ते 9 ठराव

1) कर्नाटक राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनेचे समर्थन करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला.

2) केंद्र सरकारने शेतकरी हमीभावाचा कायदा पारित करून उत्पादन खर्चाच्या दीडपट मूल्य निर्धारित करावे.

3) रानवड साखर कारखाना सुरू झाल्या बद्दल आ. दिलीप बनकर, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आघाडी सरकारचे अभिनंदन केले. तसेच शासन स्तरावरील अडचणी दूर होऊन निसाका सुरू केला जावा असा ठराव या वेळी करण्यात आला.

4) वीज वितरण कंपनीने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून शेतकऱ्यांना दिवसाच वीज द्यावी.

5) वैद्यनाथ साखर कारखाना, छत्रपती साखर कारखाना, द्वारकाधीश साखर कारखाना, संगमनेर साखर कारखाना यांच्याकडची थकीत रक्कम शेतकरी, कामगार यांना तात्काळ अदा करावे.

6) केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे नाफेड कांदा खरेदी मध्ये अधिकारी व्यापारी संगणमत करून घोटाळा करत असल्याने याबाबत सीबीआय चौकशी करावी.

7) द्राक्ष बागायतदार संघाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून त्यांनी ठरवलेल्या द्राक्ष मूल्यांचे अंमलबजावणी व्हावी.

8) बॅंकांची शेतकऱ्याला दिलेली कर्जे बेकायदेशीर दिले असतील तर ती अनैतिक ठरवली पाहिजे.

9) नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य घोषित केले असतांना वन्यप्राणी अभयारण्य लावलेले बेकायदेशीर बोर्ड तात्काळ काढावा असा ठराव करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी हक्कासाठी नवी चळवळ उभारणार

शेतकरी संघर्ष संघटना पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत या संघटनेत अनेकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर यांच्यासह शेतकरी संघर्ष संघटनेत अनेकांनी प्रवेश केल्याने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात चळवळ उभी करण्यासाठी मोठी ताकद निर्माण झाली असल्याचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

पावसाच्या तोंडावर काय आहे कृषीतज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

हरभरा पीक : पाण्याचे नियोजन हुकले तर सर्वकाही गमावले, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

हळदीचे क्षेत्र वाढूनही घटले उत्पादन, काय होणार दरावर परिणाम? वाचा सविस्तर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.