Paddy Crop : बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये घट, धान उत्पादक शेतकऱ्यांनो पुन्हा तीच चूक नका करु..!

तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि रासायनिक खताचा डोस महत्वाचा आहे. पण आता शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी खताचा अतिरेक वापर करतात. पण शेतकऱ्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे.रसायनमु्क्त उत्पादनाची मागणी होत असताना दुसरीकडे धान उत्पादनासाठी खताचा वापर वाढत जात आहे.

Paddy Crop : बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये घट, धान उत्पादक शेतकऱ्यांनो पुन्हा तीच चूक नका करु..!
बासमती तांदळाच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 3:35 PM

मुंबई : चार महिन्यापूर्वी (Rice Export) बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले होते. पण आता याच तांदळाला नाकारले जात आहे. नेमके बासमती तांदळाच्या बाबतीत असे का होत आहे याचा शोध कृषी तज्ञांनी घेतल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले आहे. किटकनाशकाच्या अति वापरामुळे ही परस्थिती ओढावली आहे. केवळ वापरच नियंत्रणात यावे असे नाहीतर (Fertilizer) खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांनीही यामध्ये अमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीची लगबग सुरु आहे. असे असताना शेतकऱ्यांनी योग्य खताचा आणि मर्यादित वापर करणे हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा भविष्यात बासमती तांदूळ उत्पादकांचे आणखीन नुकसान होणार आहे. कीटकनाशकांच्या वापरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 2018-19 मध्ये 32 हजार 804 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात झाली होती. तर गतवर्षी 26 हजार 861 कोटी रुपयांचा तांदूळ हा निर्यात झाला होता. तांदळाच्या निर्यातीसाठी त्याचा दर्जा हा खूप महत्वाचा आहे. बासमतीच्या 1 हजार 128 नमुन्यांपैकी 45 प्रकारामध्ये कीटकनाशकांचा वापर अधिक असल्याचे समोर आले आहे.

पाण्याचे व्यवस्थापन अन् संतुलित युरिया हाच पर्याय

तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि रासायनिक खताचा डोस महत्वाचा आहे. पण आता शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी खताचा अतिरेक वापर करतात. पण शेतकऱ्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे.रसायनमु्क्त उत्पादनाची मागणी होत असताना दुसरीकडे धान उत्पादनासाठी खताचा वापर वाढत जात आहे. त्यामुळे बासमती तांदळाकडे निर्यातदार पाठ फिरवत आहेत. त्यामुळे खताचा वापर हा नियंत्रित असणे गरजेचे असल्याचे बासमती एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे डॉ. रितेश शर्मा यांनी सांगितले आहे.

शेतकरीही यापासुन अनभिज्ञ

किटकनाशकांच्या अतिवापरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकरी हे नियमित खताचा वापर करीत राहिले. त्यामुळेच अधिकचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना संबंधित यंत्रणने ही माहितील दिली असती तर गतवर्षी खताचा वापर नियंत्रणात झाला असता. शिवाय शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तर नुकसान तर टळणार शिवाय उत्पादनात वाढ ही झाली असते.

हे सुद्धा वाचा

बासमती तांदळाचे हे आहेत वाण

भारतीय कृषी संशोधन संस्थेने आतापर्यंत बासमती तांदळाच्या तीन रोग प्रतिबंधक जाती विकसीत कऱण्यात आल्या आहेत. यामध्ये 1401 या तांदळाच्या जातीमध्ये सुधारणा करुन आता 1886 ही नवीन जात तयार करण्यात आली आहे. 1509 या तांदळाच्या वाणामध्ये सुधारणा करुन 1847 हे वाण विकसित करण्यात आले आहे. तर 1885 मध्ये बासमती तयार करण्यात आला आहे. या वाणाच्या तांदळामध्ये कीटकनाशकांचा वापरच करयाचा नाही. अन्यथा खर्च करुनही त्याची निर्यात न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे ह्या नवीन तीन वाणावर लक्ष केंद्रीत कऱणे गरजेचे आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.