Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:49 PM

लातूर : गेल्या काही दिवासांपासून (Agricultural Good) शेतीमालाच्या दरात कमालीची घट पाहवयास मिळाली आहे. आवक मोठ्या प्रमाणात असताना (Central Government) केंद्र सरकारची धोरणे आणि अचानक बंद झालेली हरभरा खरेदी केंद्रे याचा परिणाम सोयाबीन आणि हरभरा पिकांवर झालेला आहे. दुसरीकडे केळीच्या दरात सुधारणा होत असताना वादळी वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. मराठवाड्यासह विदर्भात पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून आता केळीची मागणी होते की नाही अशी स्थिती आहे. एकंदरीत बदलत्या वातावरणाचा परिणाम उत्पादनावर आणि बाजारपेठेतील शेतीमालाच्या दरावरही झाला आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम ?

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी सोयाबीनही आहे. मात्र, वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती पाऊस बरोबर वादळी वारेही घेऊन आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते केळी उत्पादकांचे. आता केळी तोडणीला आली आहे. शिवाय 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दरही आहे. हंगामातील विक्रमी दर असताना दुसरीकडे तोडणीला आलेल्या केळी बागा ह्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांचा तोंडचा घास हिसकावला जात आहे. नाशिकसह मराठवाड्यातील शेतकरी तोडणीला आलेली केळी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

इतर शेतीमालाच्या दराचे काय ?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातून शेतीमालाची आवक होते. विशेष करुन येथील प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन विशेष महत्व आहे.सध्या तुरीला 6 हजार 240, हरभरा 4 हजार 700, सोयाबीन 6 हजार 900, मूग 5 हजार 600 रु क्विंटल, उडीद 6 हजार 250 असे दर आहेत. शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना आता सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दिलासा मिळत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.