सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात तर घट ही ठरलेलीच होती. यामुळे हंगामाच्या सुरवातीला जरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही तरी भविष्यात दरवाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळे दर कमी असताना साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री हे गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते.

सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 2:02 PM

लातूर : सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजारपेठेतले चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरु झालेली  (Soybean) सोयाबीनची आवक आता कुठे अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, हंगाम सुरु होताना शेतकऱ्यांची भूमिका ही निराळीच होती. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे (Production Down) उत्पादनात तर घट ही ठरलेलीच होती. यामुळे हंगामाच्या सुरवातीला जरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही तरी भविष्यात दरवाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळे दर कमी असताना साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री हे गणितच (Farmer) शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते. पण आता अंतिम टप्प्यात दर घसरत असतानाही सोयाबीनची विक्री ही केली जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या आवक मधून हे निदर्शनास येत आहे.

उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा

यंदा खरीप हंगामात अधिकचा काळ पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबणीवर पडलेल्या होत्या. शिवाय ज्वारी या पिकासाठी पोषक वातावरण न राहिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा उन्हाळी हंगामावर भर दिला होता. यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. शिवाय सध्या हे सोयाबीन शेंग लागवडीच्या अवस्थेत आहे. असे असताना खरिपातील सोयाबीनची साठवणूक ही नुकासनीची ठरु शकते. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली तर पुन्हा साठवलेल्या सोयाबीनचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सध्याच्या सरासरी दरात सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

लातूरात 22 हजार पोत्यांची आवक

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला 6 हजार 600 वर गेलेले दर सध्या 6 हजार 100 वर येऊन ठेपले आहेत. आतापर्यंत दरात घसरण झाली की, सोयाबीनची साठवणूक केली जात होती पण आता शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे. उद्या मागणी घटली आणि उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर अधिकचे नुकसान होण्यापेक्षा सध्याच्या दरात विक्री करणे योग्य ठरणार आहे. असा विचार होत असल्याने संध्या दरात घट होऊन देखील आवक ही वाढलेली आहे. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक झाली होती.

संबंधित बातम्या :

Seed Production: आता बिजोत्पादनावरही ‘संक्रात’, कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट ?

भांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व

आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.