Sugar : विक्रमी उत्पादनानंतरही साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार, काय आहेत कारणे?

देशात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादनही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा तर विक्रमी उत्पादन झाले असून 7 महिने गाळप हंगाम सुरु राहिला आहे. चालू वर्षात देखील 18 मे पर्यंत 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. गतवर्षी 70 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण पावसाळा सुरु होण्यापूर्वी गाळप हंगाम पूर्ण होतो की नाही याबाबत शंका आहे.

Sugar : विक्रमी उत्पादनानंतरही साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार, काय आहेत कारणे?
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 6:26 PM

मुंबई : देशांतर्गतची परस्थिती लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच (Wheat Export) गहू निर्यातीवर (Central Government) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे काही काळ गव्हाच्या दरात अस्थिरता निर्माण झाली असतानाच आता पुन्हा एका मोठ्या निर्णयाच्या तयारीत सरकार आहे. देशांतर्गत (Sugar Rate) साखरेचे वाढते दर पाहता साखर निर्यातीवर बंदी येऊ शकते. जगात सर्वाधिक साखर उत्पादन भारतामध्ये होते तर निर्यातीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.ब्राझील हा निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. निर्यात बंदीबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दावा केला आहे. देशांतर्गत साखरेच्या दरात होत असलेली वाढ रोखण्यासाठी चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध येऊ शकतात.

उत्पादनाबरोबर निर्यातीमध्येही वाढ

देशात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादनही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा तर विक्रमी उत्पादन झाले असून 7 महिने गाळप हंगाम सुरु राहिला आहे. चालू वर्षात देखील 18 मे पर्यंत 75 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. गतवर्षी 70 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण पावसाळा सुरु होण्यापूर्वी गाळप हंगाम पूर्ण होतो की नाही याबाबत शंका आहे. 2017-18 मध्ये 6.2 लाख टन, 2018-19 मध्ये 38 लाख टन तर 2019-20 मध्ये 59 लाख 60 हजार टन साखरेची निर्यात झाली आहे. भारतामधून इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि आफ्रिकन देशात निर्यात होते. हे निर्यातीबद्दल झाले तर एकूण उत्पादनापैकी 80 टक्के साखरेचे उत्पादन हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून होते. याशिवाय ऊस उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाब या राज्यांचाही समावेश आहे.

अद्याप निर्यात बंदी निर्णयाची घोषणा नाही

साखर निर्यात बंदीच्या अननुशंगाने चर्चा सुरु असली तरी त्याबाबत अणखीन अधिकृत घोषणा झालेली नाही.यंदा विक्रमी उत्पादन होऊन देखील देशांतर्गत साखरेचे दर वाढत आहेत. निर्यातबंदी बाबत विचार सुरु असतानाच चिनी कंपन्यांचे, विशेषत: निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. रेणुका शुगरचे शेअर्स 6.66%, बलरामपूर चिनी मिल्सचे शेअर्स 5%, धामपूर शुगरचे शेअर्स 5% आणि शक्ती शुगरचे शेअर्स जवळपास 7% घसरले.

हे सुद्धा वाचा

गहू दरात वाढ झाल्याने निर्यात बंदी

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट गहू उत्पादनावर झालेला आहे. या युध्दजन्य परस्थितीमुळे उत्पादनात घट झाली असून जागतिक बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. निर्यातीबाबत हे दोन्हीही देश महत्वाचे होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे गव्हाच्या दरात यंदा 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. भारत हा चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.