Seed Processing : बीजप्रक्रिया पेरणीपूर्वीची महत्वाची क्रिया, काय आहेत फायदे?
वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी त्या पिकाचे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय पेरणारे बियाणेच जर हलक्या प्रतीचे आणि निकृष्ट असले तर उत्पादन सोडाच पण पिकाचीही वाढही योग्य पध्दतीने होणार नाही. म्हणूनच पेरणीपूर्वी बियाणाचे रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात.
लातूर : वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना (Sowing) पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी त्या पिकाचे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय पेरणारे बियाणेच जर हलक्या प्रतीचे आणि निकृष्ट असले तर उत्पादन सोडाच पण (Crop Increase) पिकाचीही वाढही योग्य पध्दतीने होणार नाही. म्हणूनच पेरणीपूर्वी बियाणाचे (Protection from diseases and pests) रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. यामुळे बियाणांमध्ये सुप्तअवस्थेत असलेल्या रोगांचे व इतर जीवाणूचे नियंत्रण हे सुरवातीलाच होते. उभ्या पिकांमध्ये दिसणाऱ्या रोगांचे मूळ हे बियाणांमध्येच असते त्यामुळे जमिनीत गाढले जाणारे बियाणे हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.त्यामुळेच ही प्रक्रिया महत्वाची आहे.
बीजप्रक्रियेने नेमका काय फायदा होतो?
बियाणे पेरणीपूर्वी बियाण्याच्या पृष्ठभागावर जिवाणू खताची प्रक्रिया केली जाते. यामुळे बियाण्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीव आपोआप जमिनीच्या संपर्कात येतात. बियाण्याची उगवण होताच सदरचे सुक्ष्मजीव मुळांच्या संपर्कात येतात येतात आणि आपले कार्य सुरु करतात. जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जिवाणू नैसर्गिकरीत्या वाढून मुळाभोवती पृष्ठभाग व्यापून टाकतात. त्यामुळे उगवणीनंतर फुलोऱ्यापर्यंत सर्व अवस्थांमध्ये सदर उपकारक सूक्ष्मजीव मूळाभोवती कार्यरत राहून पीक पोषणासाठी उपयुक्त ठरतात.
अशी करावी बीजप्रक्रिया
बीजप्रक्रियेसाठी 10 किलो बियाण्यास 200 ग्रॅम/ 200 मिलि जिवाणू खत हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे. जेणेकरून बियाण्याच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात जिवाणू खताचा थर तयार होईल. अशा प्रकारे एक किंवा एकापेक्षा अधिक जिवाणू खताचा वापर करून बियाणे सावलीत वाळवावे. भात, ज्वारी, नागली, तृणधान्ये, शेंगावर्गीय पिके, नगदी पिके, गळीत धान्ये अशा विविध पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.
बीजप्रक्रिया करताना नेमकी काय काळजी घ्यावी
बीजप्रक्रियेसाठी वापरण्यास दिलेली औषधे ही योग्य प्रमाणात आहेत का याची पाहणी होणे गरजेचे आहे. प्रक्रिया केलेले बियाणे हे हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणे गरजेचे आहे. शिवाय प्रक्रिया केलेले बियाणे हे सावलीतच ठेऊन वाळवून पेरावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी ड्रम किंवा मडक्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. मडक्यात योग्य प्रकारे बियाणे आणि औषधे मिसळून त्याचे तोंड हे फडक्याने बांधून मडके हे हलवावे लागणार आहे जेणेकरुन औषध आणि बियाणे याचे चांगले मिश्रण होईल. बीजप्रक्रिया केले जाणारे बियाणे हे विषारी असल्याने ते जनावराने खाऊ नये अशाच ठिकाणी ठेवावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच
Soybean Damage : सोयाबीन पिकलं अन् शेतातच कुजलं, हे सर्व रस्त्याअभावी लातुरात घडलं..!