अधिवेशनाकडून बळीराजाला अपेक्षा काय?; रब्बी पिकांना चांगला भाव मिळावा

आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे.

अधिवेशनाकडून बळीराजाला अपेक्षा काय?; रब्बी पिकांना चांगला भाव मिळावा
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:46 AM

नंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळावा, यासाठी बळीराजा अपेक्षा लावून बसला आहे. खरीप हंगामातील पिकांना हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना चांगला भाव मिळणार का असं काहीसं प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने दरात चांगलीच घसरण झाली होती. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आला असला तरी देखील अपेक्षित भाव मिळाला नाही आहे. कापसाला सध्या ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० पर्यंतच्या भाव मिळत आहे. तर मिरचीला ३ हजारांपासून तर ५ हजार ५०० भाव आहे. त्यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांवर बळीराजा अवलंबून आहे.

नंदुरबारमध्ये अशी केली पिक पेरणी

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात ६२ हजार ९७४ क्षेत्र हेक्टरवर पेरणी करण्यात आलेली आहे. त्यात सर्वाधिक हरभऱ्याची लागवड झाली आहे. तर त्यानंतर गहू,कांदा, मका, ज्वारी, यांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात १७ हजार ५७१.०८ हेक्टर क्षेत्रावर हरभरा, १५ हजार ६५३ हेक्टर क्षेत्रात गहू, १५ हजार ३४८.३२ हेक्टर क्षेत्रावर कांदा, ९ हजार ७८३.७४ हेक्टर क्षेत्रावर मका तर ४ हजार ६३५.८६ हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली होती. तर सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी सुरू झाली आहे.

शेती पिकाला हमीभाव मिळावा

खरीप हंगामातील पिकाप्रमाणेच रब्बी हंगामातील कांद्याची परिस्थिती झाली आहे. कांद्यावर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर झाली आहे. कांद्याला चार ते पाच रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी इतर प्रश्नांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या प्रश्न देखील गांभीर्याने घेऊन मार्ग लावला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे. मागील अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक विषयांवर खडाजंगी रंगली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूलाच राहिले होते. आता शेती पिकाला हमीभाव मिळावा, हा प्रश्न देखील मार्गी लावा अशी अपेक्षा बळीराजाला लागली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.