Grape : द्राक्ष खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक, व्यवहार करताना नेमकी काय काळजी घ्यावी?

ऑनलाईच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करणे सोपे झाले असले तरी तेवढेच धोक्याचेही आहे. काळाच्या ओघात आता अधिकतर व्यवहार हे मोबाईलद्वारेच होत आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यासह सांगलीमध्ये द्राक्ष तोडणीचा हंगाम जोमात आहे. या दरम्यान द्राक्षाचे व्यवहार होताना याच प्रणालीचा वापर केला जात आहे. पण हे कीती धोक्याचे आहे याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील चार द्राक्ष उत्पादकांना आला आहे. चार शेतकऱ्यांची तब्बल 9 लाखाची फसवणूक झाली आहे.

Grape : द्राक्ष खरेदीतून शेतकऱ्यांची फसवणूक, व्यवहार करताना नेमकी काय काळजी घ्यावी?
सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणी अंतिम टप्प्यात असून खरेदीसाठी व्यापारी दाखल होत आहेत.
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 4:14 PM

नाशिक: ऑनलाईच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करणे सोपे झाले असले तरी तेवढेच धोक्याचेही आहे. काळाच्या ओघात आता अधिकतर व्यवहार हे मोबाईलद्वारेच होत आहेत. (Nashik) सध्या नाशिक जिल्ह्यासह सांगलीमध्ये द्राक्ष तोडणीचा हंगाम जोमात आहे. या दरम्यान (Grape Sell) द्राक्षाचे व्यवहार होताना याच प्रणालीचा वापर केला जात आहे. पण हे कीती धोक्याचे आहे याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील चार द्राक्ष उत्पादकांना आला आहे. (Farmer Fraud) चार शेतकऱ्यांची तब्बल 9 लाखाची फसवणूक झाली आहे. सदरील व्यापाऱ्याने 11 लाखाची द्राक्ष खरेदी करुन 2 लाख रुपये हे व्यवहार दरम्यानच दिले तर उर्वरीत रक्कम ही ऑनलाईद्वारे जमा करणार असल्याचे सांगितले. खानापूरातील दत्तात्रय तुकाराम शिंदे, संभाजी महादेव जाधव, नेताजी दगडू जाधव, जयदीप सुरेश जाधव या चार जणांना उंब्रज येथील विजय बाळासाहेब तांबवे व सुरज बंडगर यांनी फसवले आहे. त्यामुळे द्राक्ष व्यवहार करताना कोणती काळजी घेणे महत्वाचे याची माहिती आपण घेणार आहोत.

शेतकऱ्यांनो व्यवहार करताना ही घ्या काळजी

शेतीमालाच्या उत्पादकतेपेक्षा बाजारातील दराला अधिकचे महत्व आहे. येथील व्यवहारावरच शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत कामी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना तोंडी नाही तर लेखी व्यवहार करणे गरजेचे आहे. यामध्ये द्राक्ष मालाचा दर, वाण याचा उल्लेख होणे गरजेचे आहे. शिवाय व्यापाऱ्याचा प्रतिनीधी किंवा निर्यातदाराचा प्रतिनीधी यांचे नाव, आधारकार्ड, मोबाईल नंबर याची अचूक नोंद घ्यावी लागणार आहे.

अशी होते फसवणूक

द्राक्षाचे खरेदी करताना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होईपर्यंत व्यवहार हे चोख केले जातात. त्यानंतर मात्र, द्राक्ष खरेदी करुन काही दिवसांनी पैसे देतो किंवा ऑनलाईनद्वारे पाठवितो असे सांगण्यात येते. मात्र, एकदा का माल खरेदी केला की व्यापारी शेतकऱ्यांकडे फिरकत नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. नाशिक आणि सांगली जिल्ह्यामध्ये असे प्रकार दरवर्षी समोर येतात. यासंबंधी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही पुरव्याअभावी कोणतीच कारवाई ही झालेली नाही.

द्राक्ष उत्पादक संघाचे काय आहे आवाहन

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये द्राक्ष उत्पादक संघाने एक सौदे पावत्यांची छपाई केली आहे. शिवाय द्राक्ष उत्पादकापर्यंत ती पोहचवली आहे. मात्र, याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.या पावतीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, गट नंबर, आधार नंबर याचा उल्लेख आहे तर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक याची माहिती शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेच आहे. तर सौद्याचे स्वरुपमध्ये द्राक्ष वाणाचे नाव, ठरलेला भाव प्रतिकिलो, द्राक्ष तोडणीची तारीख, गाडी नंबर, वजन, एकूण रक्कम आणि पेमेंट देण्याची तारीख याचा उल्लेख आहे. त्यामुळे अशा स्वरुपाची माहिती भरुनच व्यवहार करण्याचे आवाहन द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक अॅड. रामनाथ शिंदे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Scheme : शेतकऱ्यांचे योजनांसाठी अर्ज, मात्र निवड होते कशी? वाचा सविस्तर

शेतीच्या जोडव्यवसयांना सरकारचे पाठबळ, पायाभूत सुविधा अन् योजनांचाही मिळणार लाभ

सोयाबीन केंद्रस्थानी : वाढत्या दराने बदलली बाजारपेठेतली समीकरणे, सर्वकाही ‘रेकॉर्ड ब्रेक’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.